अमळनेर : दुकानावर लावण्यात आलेला कर कमी करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाºया पालिकेच्या दोन कर्मचाºयांना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ रोजी रंगेहाथ पकडले.तक्रारदाराचे शहरात दुकान असून या दुकानांवर लावण्यात आलेला कर कमी करण्यासाठी अमळनेर पालिकेचे वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव व शिपाई मनोज निकम यांनी १२ हजार रुपयांची मागणी केली होती. या विषयी तक्रार करण्यात आल्यानंतर लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक जी.एम.ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, पो.हे.कॉ. सुनील पाटील, पो.ना.मनोज जोशी, श्यामकांत पाटील, पो.कॉ.प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, अरुण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांनी १९ रोजी मनोज निकम यास तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले.