जळगाव : अमळनेर येथील नगरसेवक घनश्याम उर्फ श्यामकांत जयवंतराव पाटील (वय 31) याच्यावर बुधवारी जिल्हाधिका:यांनी एमपीडीएची कारवाई करून स्थानबद्धतेचे आदेश दिले होते. मात्र, ते आदेश बजावण्यापूर्वी आरोपी पसार झाला. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर यांनी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली केली आह़े तसेच त्यांच्या वादग्रस्त प्रकरणांच्या चौकशींचे आदेश अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना देण्यात आले आहेत़ दरम्यान, त्यांचा तात्पुरता पदभार सहायक पोलीस निरीक्षक उदय साळुंखे यांच्याकडे दिला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर श्यामकांत पाटील याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिका:यांनी 15 रोजी दिले होते. त्यानंतर अमळनेर पोलिसांनी त्याला स्थानबद्ध करून नाशिक कारागृहात रवानगी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिली. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी पाटील याला स्थानबद्ध केले नसल्याचे उघड झाले. त्यामुळे अमळनेर पोलिसांनी खोटी माहिती पुरवल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले होत़े याप्रकरणी अमळनेरचे डीवाय.एस.पी. रमेश पवार यांनी चौकशी करून पोलीस अधीक्षकांकडे अहवाल पाठविला. त्यानुसार डॉ़ सुपेकर यांनी शुक्रवारी पोलीस निरीक्षक वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली केली़ नगरपालिका निवडणूक काळात अमळनेरात दंगल झाली होती़ वाद झाल्यानंतरही त्याची खबरदारी घेण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केला होता़ यानंतर डॉक्टर मुलाच्या अपहरणाची घटना घडली होती़ यासह इतर पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या वादग्रस्त प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिले आह़े या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक डॉ़ सुपेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े
अखेर अमळनेर पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी
By admin | Published: February 18, 2017 12:32 AM