शेंदुणी, ता.जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी एकुण १६ अर्ज प्राप्त झाले होते. छाननी दरम्यान त्यापैकी १० अर्ज बाद ठरले. त्यामुळे आता ६ उमेदवार रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी १३० इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६९ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे १७ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात आहेत. छाननीनंतर आता माघारीकडे उत्सुकता लागली आहे.शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून नगराध्यक्षपदासाठी १ व नगरसेवक साठी १७ त्याच पद्धतीने भारतीय जनता पाटीर्चे नगराध्यक्ष साठी १ व नगरसेवकपदासाठी पदासाठी १७ व शिवसेनेकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. तर मनसेचे नगराध्यक्षपदासह ९ उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले.प्रति स्पर्धांमध्ये आपले अधिकृत उमेदवार समजू नये यासाठी पक्षातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले होते. त्यांना पक्षाने एबी फॉर्म न दिल्यामुळे ते अवैध ठरले.
शेंदुर्णी नगरपरिषद निवडणुकीतील ७१ उमेदवारांचे अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 9:52 PM
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी एकुण १६ अर्ज प्राप्त झाले होते. छाननी दरम्यान त्यापैकी १० अर्ज बाद ठरले.
ठळक मुद्देशेंदुर्णी नगरपरिषदेसाठी दाखल उमेदवारी अर्जांची झाली छाननीनगराध्यक्षपदासाठी ६ तर नगरसेवकसाठी ६१ अर्ज वैधभाजपा व राष्ट्रवादीने दिले समान उमेदवार