चाळीसगाव, जि.जळगाव : मन्याड धरणाची उंची वाढविण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून २२ खेड्यातील शेतकऱ्यांच्या सहभागाने जि.प.चे माजी सदस्य किशोर माधवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणासह आणि चाळीसगाव शहरात गेल्या महिनाभरापासून वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना सूचना न देता, मनमानी पद्धतीने रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसवण्यात येत होते. याविरोधात रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी सुरू केलेले उपोषण बुधवारी दुपारी लेखी अश्वासनानंतर मागे घेण्यात आले.वाढीव वीज बिले येत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. बुधवारी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर थाळीनाद आंदोलनही केले गेले. वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी नवीन वीज मीटरला सात दिवस स्थगिती दिली आहे. नवीन वीज मीटरबाबत तक्रारीचे निराकरण करून शंकेचे समाधान झाल्यावरच नवीन मीटर बसवू, असे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.दोन्ही आंदोलनाच्या सांगतेला माजी आमदार राजीव देशमुख, युवा उद्योजक मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे जि.प.तील गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, किसनराव जोर्वेकर, जनआंदोलन समितीचे प्रा.गौतम निकम, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान राजपूत, संजय पाटील, कॉंग्रेसचे अनिल निकम आदी उपस्थित होते.मन्याडची उंची वाढविणारकिशोर माधवराव पाटील यांच्यासह मन्याड परिसरातील २२ खेड्यातील शेतकऱ्यांसह मन्याड धरणाची उंची वाढविण्यासाठी सुरू असलेले उपोषण जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या अश्वासनानंतर सोडण्यात आले. जलसंपदा विभागाचे प्रवीण मोरे, सचिन पाटील, गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील यांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासह उंची वाढविण्याचा प्रस्ताव व गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे अंदाजपत्रक लवकरच शासन स्तरावर पाठविण्याचे अश्वासन दिले. मन्याडच्या आंदोलनात जगदीश पाटील, धनराज पाटील, नीलेश पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, सीताराम पाटील, संदीप पाटील, जितेंद्र चौधरी, छगन जाधव, डी.ओ.पाटील यांनी सहभाग घेतला.आंदोलनस्थळी प .सं. उपसभापती संजय पाटील, जि.प.चे माजी सदस्य मंगेश चव्हाण, प्रभाकर जाधव, किशोर पाटील, पं.स.चे माजी सदस्य दिनेश बोरसे, शेषराव पाटील, विजय जाधव, पं.स. सदस्य अजय पाटील, नगरसेवक सुरेश स्वार, बाजार समितीचे संचालक धर्मा काळे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष श्याम देशमुख, खुशाल पाटील, सचिन स्वार, अरुण पाटील, छोटू पाटील, बबन पवार, जितेंद्र राजपूत, राहुल पाटील, दिनकर पाटील, प्रभाकर चौधरी, सतीश पाटे, पप्पू पाटील, भाऊसाहेब पाटील, भैयासाहेब पाटील, हरी नाना जाधव, देवळीचे छगन जाधव, प्रशांत राजपूत, सागर नागणे, संजय ठाकरे, विजय पाटील, गौतम निकम, मुकुंद पाटील, आकाश पोळ, प्रभाकर पारवे, लहू बाबर, सुनील जाधव आदींनी उपस्थित राहून दोन्ही आंदोलनांना पाठिंबा दर्शविला.
चाळीसगावला आश्वासनानंतर झाली दोन्ही उपोषणांची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 8:09 PM
मन्याड धरणाची उंची वाढविण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून २२ खेड्यातील शेतकऱ्यांच्या सहभागाने जि.प.चे माजी सदस्य किशोर माधवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणासह आणि चाळीसगाव शहरात गेल्या महिनाभरापासून वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना सूचना न देता, मनमानी पद्धतीने रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसवण्यात येत होते. याविरोधात रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी सुरू केलेले उपोषण बुधवारी दुपारी लेखी अश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
ठळक मुद्देमन्याडची उंची वाढविणार नवीन वीज मीटरला सात दिवस स्थगिती