अमळनेर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका:यांनी येथील दोन दूध संकलन केंद्रांतील दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. एका केंद्रातील दुधाची तपासणी केली आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी आर.आर.चौधरी यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता येथील कुंटे रोडवरील वर्णेश्वर दूध डेअरी , जुने बस स्टॅण्ड जवळील गुरुदत्त डेअरी यांचे दूध तपासणीसाठी ताब्यात घेतले. आनंद दूध डेअरीतील दुधाची तपासणी केली. याबाबत चौधरी यांनी सांगितले की, सदरची नियमित तपासणी आहे. घेतलेले नमुने मुंबई किंवा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील. तपासणी अहवालात नमुने भेसळयुक्त आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. संत सखाराम महाराज यात्रोत्सव सुरू होत असून, यात्रेतील विक्रेत्यांनी आणि शहरातील विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी. अन्यथा पुढील आठवडय़ात होणा:या तपासणीत विना परवानगी दुकाने सुरु असल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी दुकानदारांनी परवानगी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने चौधरी यांनी केले आहे. (वार्ताहर)
दूध संकलन केंद्रांची झाली तपासणी
By admin | Published: April 26, 2017 12:14 AM