वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : पत्नीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पतीचेही निधन झाले. यानंतर दोघांची अंत्ययात्रा सोबत काढण्यात आली. सावखेडा खुर्द, ता.पाचोरा येथे शनिवारी ही घटना घडली.सावखेडा खुर्द गावी १८ जानेवारी रोजी भागवत सप्ताहाची सांगता झाली. ज्या ठिकाणी भागवत सप्ताह सुरू होता, त्याच्याच शेजारी हे दाम्पत्य आपल्या मुलांसह राहत होते. १९ रोजी सकाळी ९ .३० वाजेच्या सुमारास कमलबाई अभिमन सुतार (वय ७५) यांचे निधन झाले. पत्नीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पती अभिमन देवचंद सुतार (वय ८५) यांचेही सायंकाळी सहाला निधन झाले.पती-पत्नीच्या काही तासांच्या अंतराने झालेल्या निधनाची चर्चा गावासह पंचक्रोशीत सुरू होती. यानंतर दोघांची अंत्ययात्रा सोबतच काढण्यात आली. शनिवारी रात्री साडेनऊला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांना अखेरचा निरोप दिला.
पाचोरा तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे पत्नीच्या निधनानंतर पतीनेही घेतला जगाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:32 PM
पत्नीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पतीचेही निधन झाले. यानंतर दोघांची अंत्ययात्रा सोबत काढण्यात आली. सावखेडा खुर्द, ता.पाचोरा येथे शनिवारी ही घटना घडली.
ठळक मुद्देसकाळी पत्नीचे, तर सायंकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पतीचेही निधनएकीकडे भागवत सप्ताह सुरू असताना घडली घटनाग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात घेतला अंत्ययात्रेत सहभाग