फैजपूर जि.जळगाव : कळमोदा, ता.रावेर येथील शेतकरी तथा ग्रामस्थ काशिनाथ बाबूराव पाटील यांनी कळमोदा ते फैजपूर हा चार किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीसाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर १० रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला, मात्र ग्रामस्थांच्या आनंदावर क्षणातच विरजण पडले, कारण कुठे माशी शिंकली व तासाभरात रस्त्याच्या कामाला ‘ब्रेक’ लागला व काम थांबवून आलेले अधिकारी व कामगार हे यंत्रसामग्रीसह आपला गाशा गुंडाळून तेथून निघून गेले.आता हे काम १० दिवसांनंतर सुरू होईल, असे पत्र दुसऱ्या दिवशी देण्यात आले आहे. मात्र काशिनाथ पाटील यांनी रस्त्याचे काम त्वरित सुरू न झाल्यास आपण १८ आॅक्टोबरला आत्मदहन करूच, असा निश्चय केला.कळमोदा ते फैजपूर हा रस्ता गेल्या चार पाच वर्षांपासून खराब झाला असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्ता खराब असल्याने कळमोदा ग्रामस्थांनी फैजपूर शहराशी व्यवहारसुद्धा बंद केलेले आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी १८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काशिनाथ पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेमार्फत १० रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी मागवलेल्या यंत्रसामुग्रीचे पूजन उपसरपंच वासुदेव बाक्षे यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याचे काम सुरू होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते, मात्र या आनंदावर क्षणात विरजण पडले, कुठे माशी शिंकली, हे कळू शकले नाही व एका तासात रस्त्याच्या कामाला ब्रेक लागला व उपस्थित अधिकारी यांनी यंत्रसामग्रीसह कळमोदा रस्त्यावरून काढता पाय घेतला. मात्र सुरू झालेले काम का बंद झाले, याचे उत्तर ते देऊ शकले नाही.दुसºया दिवशी बांधकाम विभागातर्फे पत्रदरम्यान, ११ रोजी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काशिनाथ पाटील यांना पत्र देऊन रस्त्याचे काम १० दिवसांनंतर सुरू करण्यात येईल. तरी आपण आत्मदहन करू नये, अशी विनंती केली, पण काशिनाथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की रस्त्याचे काम सुरू न झाल्यास दिनांक आपण १८ रोजी आत्मदहन करणारच व आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.
कळमोदे येथे शुभारंभानंतर तासाभरातच रस्त्याच्या कामाला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 9:59 PM
कळमोदा, ता.रावेर येथील शेतकरी तथा ग्रामस्थ काशिनाथ बाबूराव पाटील यांनी कळमोदा ते फैजपूर हा चार किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीसाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर १० रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला, मात्र ग्रामस्थांच्या आनंदावर क्षणातच विरजण पडले,
ठळक मुद्देग्रामस्थांच्या आनंदावर क्षणात विरजण१० दिवसांनंतर काम सुरू होणार असल्याचे दिले पत्र