शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

मोबाइल व पैसे लुटल्यानंतर केली बँकेतून पैसे काढण्याची हिम्मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:15 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बसस्थानकापर्यंत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नितीन ज्ञानेश्वर बाविस्कर (१७, रा. कृष्णाजीनगर, अडावद, ता. चोपडा) या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बसस्थानकापर्यंत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नितीन ज्ञानेश्वर बाविस्कर (१७, रा. कृष्णाजीनगर, अडावद, ता. चोपडा) या तरुणास चार भामट्यांनी मारहाण करून त्याचा मोबाइल हिसकावला. या तरुणाकडून आणखी पैसे पाहिजे असल्याने भामट्यांनी त्याला बँकेत नेले. खात्यात पैसे नसल्याने या भामट्यांनी बँकेतून पलायन केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन बाविस्कर हा तरुण शुक्रवारी दुपारी एसटी बसने जळगावात आला. शिवाजी नगरात उतरल्यानंतर रेल्वे रूळ ओलांडून तो तहसील कार्यालयाजवळ आला होता. तेथे त्याने दुचाकीस्वार भामट्यास बसस्थानकाचा पत्ता विचारला. पत्ता न सांगता भामट्याने नितीनला लिफ्ट दिली. परंतु, त्याला बसस्थानकात न घेऊन जाता एका अज्ञातस्थळी नेले. तेथे भामट्याचे आणखी तीन साथीदार हजर होते. या चौघांनी नितीनला मारहाण करून त्याच्याजवळील १० हजार रुपयांचा मोबाइल व पाचशे रुपये काढून घेेतले. भामट्यांनी आणखी काही आहे का? याची तपासणी केली असता नितीनच्या बॅगेतून स्टेट बँकेचे पासबुक मिळून आले. बँकेत किती रक्कम आहे याचीही विचारणा केली. खात्यात पैसे नसल्याचे नितीनने सांगितले. यानंतर भामट्यांनी पुन्हा नितीनला दुचाकीवर बसवून स्टेडियम समोरील स्टेट बँकेत आणले. त्याठिकाणी रितसर नितीनच्या पासबुकची एंट्री करून रक्कम तपासून घेतली. खात्यात पैसे नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चारही भामट्यांनी बँकेतून पळ काढला. तत्पूर्वी त्यांनी नितीनला पोलिसात न जाण्याची धमकीही दिली. भामटे पळून गेल्यानंतर नितीनने शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.