शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

राष्ट्रवादीच्या सभेनंतर हुल्लडबाजी

By admin | Published: February 14, 2017 1:13 AM

पाळधी येथील घटना : उमेदवाराची पोलीस अधीक्षकांकडे दगडफेकीची तक्रार

पाळधी / जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित सभेनंतर  काही कार्यकत्र्यानी हुल्लडबाजी केल्याची घटना पाळधी ता. धरणगाव येथे सोमवारी रात्री 10 वाजता घडली. तर शिवसेनेच्या कार्यकत्र्यानी दगडफेक केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.  गांधी चौकात राष्ट्रवादीतर्फे रात्री 8.30 वाजता जाहीर सभा घेण्यात आली. यात माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, विलास पाटील तसेच उमेदवार रमेश माणिक पाटील यांची भाषणे झाली. रमेश पाटील यांनी भाषणात प्रताप पाटील यांना उमेदवारी द्यायची असल्याने आपली उमेदवारी कापण्यात आल्याचा  उल्लेख  करीत गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.  सभा आटोपल्यानंतर या वाक्याबद्दल पाळधीतील काही तरुणांनी रमेश पाटील यांना जाब विचारला व त्यांच्या वाहनाभोवती हुल्लडबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत जमलेल्या युवकांना पांगविले.  दरम्यान, राज्यमंत्री गुलाबराव पाटील व त्यांच्या समर्थकांवर कारवाई करावी यासाठी 50 ते 60 जण रात्री साडेअकरा वाजता जळगावात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते.तेथे रमेश पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, सभा आटोपल्यानंतर ते कारने घराकडे जात असताना  जमावाने शिवीगाळ करुन कारवर हल्ला केला. यावेळी  तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती पाहता पोलिसांनी  मला तेथून हलविले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 4या हल्ल्यानंतर रमेश पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना घटनेची माहिती दिली. देवकर यांनी  पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  पाळधीत तक्रार करण्याचे सांगितले, मात्र स्थानिक पोलीस मंत्र्यांच्या दबावात असल्याचा आरोप करुन पाटील यांनी तेथे तक्रार न करता थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी त्यांच्यासोबत माजी जि.प.सदस्य रवींद्र भिला पाटील, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, दोनगावचे माजी सरपंच अशोक शिंदे, किशोर पाटील, डी.एस.पाटील, शिवाजी पाटील, नीलेश पाटील, आनंदा पाटील, पं.स.चे उमेदवार किरण नन्नवरे यांच्यासह अनेक जण पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते.4मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणार असल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सभेनंतर दगडफेक झालेली नाही. गावात आतार्पयत अनेक सभा झाल्या आहेत. कधीच असे प्रकार घडले नाही आणि घडणार नाहीत. कारण गावातील लोक सूज्ञ आहेत. आपण नेहमी मतांच्या आशीर्वादावर निवडून येतो, भानगडीवर नाही.  - गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री, जळगाव.पाळधीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. बंदोबस्तासाठी तैनात पोलीस लक्ष ठेवून होते. बाकी काही घडले असेल तर ते राजकीय आहे.- विजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, पाळधी.