जळगाव : पुलावरील खड्डे चुकविताना दुचाकी स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने राजेश रमेश पाटील (वय ३४, रा. पिंप्राळा, मुळ रा.कापडणे, ता.जि.धुळे) हा तरुण अभियंता ठार झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता वावडदाजवळील पुलावर घडला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, म्हसावद येथील थेपडे इंग्लिश मेडियम स्कूलची बस वडलीकडून विद्यार्थी घेऊन येत होती तर राजेश पाटील हे दुचाकीने पाचोऱ्याकडे जात असताना वावडदा गावाजवळील वडली रस्त्यावर समोरुन येणारी स्कूलबसची दुचाकीला धडक बसली. त्यात दुचाकी बाहेर फेकली गेली तर राजेश पाटील हे चाकाखाली आले. त्यांना बसने दहा फूटापर्यंत फरफटत नेले.आधारकार्डवरुन पटली ओळखहा अपघात झाल्याचे लक्षात येताच बसस्थानकावर थांबलेल्या गावकºयांनी पुलावर धाव घेतली. गावातील रवींद्र त्र्यंबक पाटील उर्फ रवी कापडणे यांनी तातडीने जखमी असलेल्या राजेश पाटील यांना त्यांच्या स्वत:च्या चारचाकीतून जिल्हा रुग्णालयात आणले. त्यांच्या खिशात असलेल्या आधारकार्डवरुन पाटील यांची ओळख पटली. जिल्हा रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
खड्डे चुकविताना दुचाकी स्कूल बसच्या चाकाखाली येऊन अभियंता ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 1:38 PM
वावडदाजवळील पुलावर अपघात
ठळक मुद्देआधारकार्डवरुन पटली ओळखबसने दहा फूटापर्यंत फरफटत नेले