तसेच `वंचित`ला सोबत घेण्याबाबत दिल्ली दरबारी माजी मंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील अनेकवेळा प्रयत्न केले. मात्र, तरीदेखील दिल्लीतील नेत्यांकडून नकार येत असल्याचेही विनोद सोनवणे यांनी यावेळी सांगितले. शिरसोली रस्त्यावरील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पश्चिम विभाग प्रमुख प्रमोद इंगळे, जळगाव महानगर प्रमुख दीपक राठोड, महानगर सचिव नारायण अटकोळे, विद्यासागर खरात, जितेंद्र केदार, देवदत्त मकासरे, मनोज अडकमोल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी सोनवणे यांनी नाना पटोले हे एकीकडे काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे सांगतात तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची घोषणा करतात, त्यामुळे पटोले यांचे नेमके काय चालले आहे, हे समजत नसल्याचेही सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वरिष्ठांच्या अनुमतीनंतर नाना पटोलेंनी युतीबाबत बोलावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:12 AM