१०. खुन्नस- हा तसा गंभीर प्रकाऱ इच्छित गोष्ट मिळाली नाही की व्यक्ती बेफाम होते़ डुख धरते़ विषारी साप, विंचू डुख धरतात म्हणे आणि दंश करून विष पसरवतात़ योग्य आणि तत्काळ उपचार न झाल्यास माणूस गतप्राण होऊ शकतो़ पण हे डुख धरणं माणसात आहे़ ते खुन्नस या प्रकारे एखादी सुंदर करिअरिस्ट तरुणी भविष्याची अनेक स्वप्ने पहात मित्र-मैत्रिणींसमवेत कॉलेजचे मोरपंखी जीवन जगत असते़तिच्यावर नजर ठेवणारा कुणी एक तरुण तिला त्रास देतो़ ती प्रतिसाद देत नाही, मग याची खुन्नस वाढत जाते आणि मग ही हिस्त्र व्यक्ती तिला एकटीला गाठून तिच्या देखण्या चेहऱ्यावर अॅसिड टाकते. रॉकेल, पेट्रोल फेकते़ काडी लावते. अरे ही कसली खुन्नस? प्रेम तर नव्हेच नव्हे!जमीन-जुमला, पैशाचे व्यवहार, गावातील राजकारण, आंतरजातीय विवाह केला म्हणून असे विखारी लोक खुन्नस घेऊनच जगतात़ दुसºयाचं आयुष्य उद्ध्वस्त करून यांना काय मिळतं?११. आदळआपट- हा थोडा वेगळा प्रकार आहे़ यात व्यक्ती रागावली की, प्रत्येक काम आदळआपट करतच करते़ स्वयंपाकघरात ‘ती’चा राग अनावर झाला असेल तरी तिची कृती साधारण अशी असते़ समजा ती पोळ्या करीत असेल तर दणकन परात आपटेल, खाडकन कणकेचा डबा उघडेल़ भरर्कन परातीत पाणी ओतेल़ कणिक मळून परात आपटून पुढचा सगळा स्वयंपाक आदळआपट करतंच पूर्ण करेल़आॅफिसात कामाचा ताण, बॉसनं दिलेला त्रास, ‘तो’ घरात आदळआपट करून व्यक्त करेल,़ धाडकन गेट उघडेल, दणक्यात बाईक, स्कूटर, कार पार्क करेल, नॉनस्टॉप कॉलबेल वाजवेल. चपला, शूज पाय आपटतच काढेल आणि तो आॅफिसचा राग प्रत्येकावर आदळआपट करत, कांगावा करत व्यक्त करेल़१२. थयथयाट- ही कृती छोट्या मुलांमध्ये आणि कणभर जरी समोरचा चुकला असेल तरी मणभर थयथयाट करणाºया अनेक स्त्री-पुरुषांमध्ये हा रागप्रकार आढळतो़ स्थळ- खेळण्यांचं दुकाऩ़ आईबाबांसमवेत गोंडस तीन-चार वर्षांचं त्यांचं लाडकं बाळ. रंगीबेरंगी खेळण्यांचं आकर्षण अन् हातात घेतलेलं प्रत्येक खेळणं मला हवंच हा हट्ट खेळण्यांच्या किमती अव्वाच्या सव्वा. मग आईबाबा- अरे तू अजून लहान आहेस. हे छी...छी... हे घे..., ते घे... असं समजावणं आणि मग काय त्या चिमुरड्या-चिमुरडीचा थयथयाट. कुठून दुर्बुद्धी झाली अन् याला-हिला दुकानात आणलं, असा आई-बाबांचा अविर्भाव़न सांगता मोलकरीण तीन-चार दिवस घरी राहिली की बाईसाहेबांचा तिला पहाताच थयथयाट सुरू. असंख्य शब्दफेकींसोबतच तिची अडचण काय, आजारी होती का आणखी काही घटना घडली का? नाही, ती विचारपूसच नाही. घरचे इतर सदस्य आवरायचा प्रयत्न करतात, पण हा थयथयाट सुरू राहतो. तोंडाच्या पट्ट्यांसोबत अन् मग जेव्हा ती मोलकरीण म्हणते, ‘बरं, मग मी जाऊ? लावा दुसरी बाई कामाला’ तेव्हा हा थयथयाट थांबतो खट्टदिशी़१३. आकांडतांडव- या राग प्रकारातून व्यक्त होणारी कृती आजूबाजूचा माहोल बिघडवून टाकते़ एखादा कडक बॉस तो म्हणेल तीच पूर्व दिशा, हेकेखोर स्वभाव. कर्मचाऱ्यांकडून चूक झाली की हे लोक आकाशपाताळ एक करत आकांडतांडव करतात, आॅफिस डोक्यावर घेतात.नवा माणूस सुरुवातीला पार घाबरतो, पण मग हे तांडव त्याच्या परिचयाचं होऊन जातं. सासू-सुनेचं आकांडतांडव हाही एक जबरदस्त रागप्रकार आहे़ दोघींपैकी एक समजूतदार असेल तर हा प्रकार आढळत नाही़ पण दोघीही एकीपेक्षा एक असतील तर मात्र विचारूच नका. एकमेकींवर कुरघोही करायला टपलेल्या असतात. उणंदुणं सापडलं की आधी घर मग परिसर आकांडतांडवाने दणाणून सोडतात़ (क्रमश:)-प्रिया सफळे, जळगाव
उणं दुणं काढल्यानंतर दणाणतो परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 2:04 AM