ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.20 - तालुक्यातील निंभोरा-पिंप्रीसेकम ग्रामपंचायतीचे सरपंच शालिक सोनू सोनवणे (वय 61) यांची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केला असून मंगळवारी या निषेधार्थ गाव कडकडीत बंद ठेवण्यात आल़े भिल्ल समाजातील जिल्हा पातळीवरील नेत्यांनी सोनवणे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केल़े
सरपंच शालिक सोनवणे हे 15 जूनपासून घरातून बेपत्ता झाल्यानंतर तालुका पोलिसात याबाबत हरवल्याची नोंद होती तर सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास फेकरी उड्डाणपुलावरील पहिल्या खांबाजवळ त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती़ यानंतर ग्रामस्थ व नातेवाईकांनी संतप्त होत सत्ताधारी ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांवर संशयाची सुई व्यक्त करीत त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग तब्बल चार तास रोखून धरला होता़ पोलीस अधिका:यांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होत़े
दरम्यान, मंगळवारी दुस:या दिवशी हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव कडकडीत बंद ठेवले आहे तर गावातील विविध भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आह़े मृतदेहाचे धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आज दुपारी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा उलगडा होणार आह़े
दरम्यान, सोमवारी दिवसभर ग्रामपंचायतीच्या 16 महिला व पुरूष सदस्यांची चौकशी करण्यात आली तर रात्री सर्वाना सोडण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितल़े