चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील चहार्डी येथील शेतकरी साखर कारखान्याच्या उसाच्या थकीत रकमेचा प्रश्न न सुटल्याने २७ आॅगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी.पाटील यांनी म्हटले आहे.साखर आयुक्त, तहसीलदार दीपक गिरासे व पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील या सर्वांनी विनंती केल्यावरून १५ आॅगस्टचे आत्मदहन आंदोलन स्थगित केले होते. परंतु संचालक मंडळाने त्यांच्या काही जवळच्या लोकांना जास्त व काहींना एक रुपयादेखील दिला नाही, अशा मनमानी पद्धतीने पैशांचे वाटप केले तर साखर आयुक्तांनी केलेल्या आरआरससी कार्यवाहीने आमचे पैसे लवकर निघणार नाहीत म्हणून जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती जप्त करावी अन्यथा आमचे पैसे द्यावेत, ह्या मागणीसाठी स्थगित केलेले आत्मदहन आंदोलन २७ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहे, ज्यांना ज्यांना पाठिंबा द्यावयाचा आहे त्यांनी यावे, असे आवाहन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.चोपडा तालुक्यातील शेतकºयांनी आत्मदहन करावे, अशी इच्छा येथील पदाधिकारी व नेत्यांची आह,े कारण प्रशासन आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहे, तर जे जबाबदार आहेत ते दुर्लक्ष करीत असून, जे काही गैरप्रकार चालू आहेत त्यांना समर्थन देत आहेत, अशी आम्हाला शंका आहे. या वेळेस काहीही अघटित घडल्यास त्याला कारखान्याचे पदाधिकारी जबाबदार राहतील, असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
‘चोसाका’कडील उसाचे पैसे न मिळाल्याने पुन्हा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 4:57 PM