शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 12:19 PM

मंत्री आज जळगावात

जळगाव : शिवसेनेचे नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी मुंबईत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेवून आशिर्वाद घेतले. दरम्यान, बुधवारी गुलाबराव पाटील हे जळगावला येत आहेत. सकाळी ११ वाजता त्यांचे शिवसेनेकडून जंगी स्वागत करण्यात येणार आहे.भेटी दरम्यान, सुरेशदादा यांनी मंत्रीपद मिळाल्याबद्दल गुलाबराव पाटील यांचे अभिनंदन केले. सुमारे तासभर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यांच्यासोबत बाजार समिती सभापती कैलास चौधरी, नगरसेवक गणेश सोनवणे, मनोज चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची त्यांचा मातोश्री या निवासस्थानावर जावून भेट घेत आशिर्वाद घेतले. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यांतर ते बुधवारी प्रथमच शहरात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सर्व तालुकाप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांना बुधवारी सकाळी ११ वाजता रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहण्याचा सूचना दिल्या आहेत.रेल्वे स्टेशनपासून रॅलीपाटील यांच्या स्वागतासोबतच शिवतिर्थ मैदानापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान, जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत मंगळवारी होणारी शिवसेनेची बैठक रद्द करण्यात आली. ती बैठक बुधवारी पद्मालय या शासकीय विश्रामगृहावर घेण्यात येणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव