जळगाव : चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला अन् क्षणातच बँकेच्या स्थानिक आणि मुंबई कार्यालयात सायरन वाजल्याने सावध झालेल्या चोरट्यांनी धूम ठोकली. एमआयडीसी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काशिनाथ चौकात मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली. दरम्यान, संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सायरनमुळे एटीएममधील लाखो रुपयांची रोकड सुरक्षित राहिली आहे.रविवारी मध्यरात्री १.२३ वाजता एचडीएफसी बँकेचे एटीएम लुटण्यासाठी चारचाकीने पाच ते सहा चोरटे आले होते. एका चोरट्याने कटरच्या सहाय्याने एटीएम तोडण्याचा प्रयत्न करताच मुंबई येथील मुख्य कार्यालयात सायरन वाजला आणि चोरट्यांचा प्रयत्न फसला.बॅँक अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकारया घटनेच्या संदर्भात एचडीएफसी बॅँकेचे स्थानिक अधिकारी रवींद्र रामटेककर यांच्याशी ‘लोकमत’ ने संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. पोलिसांकडे तक्रारही केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी देखील बॅँकेच्या अधिकाºयांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती दिली.११ मिनिटे एटीएमच्या केबिन मध्ये होते चोरटेपोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता १.२० मिनिटांनी पांढºया रंगाचीचारचाकी एटीएमजवळ थांबली. रेनकोट घातलेल्या व्यक्तीने आतमध्ये प्रवेश केला. यानंतर तो पुन्हा बाहेर पडला. यानंतर पुन्हा दुसराएक जण तोंडाला रुमाल बांधलेला १.३१ वाजता कटरने केबल तोडतांना दिसत आहे. दोन जण एटीएम बाहेर उभे जातांना दिसत आहे.तिघांची चौकशीगुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची चौकशी केली. एटीएम फोडण्याचे गुन्हे दाखल असलेल्या दोघांची चौकशी केली, त्यातील एक जण कारागृहात आहे. दोघं काही दिवसापूर्वीच जामीनावर बाहेर आले आहेत. आणखी काही जणांच्या शोधासाठी पथक गेलेले आहे.अशी हलली यंत्रणारात्री १.२३ वाजता अंगात स्वेटर, तोंडाला रुमाल व हातात कटर घेऊन एक चोरटा बॅँकेच्या एटीएम असलेल्या कॅबिनमध्ये गेला. कटरच्या सहाय्याने मशीन तोडण्याचा प्रयत्न करताच बॅँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात सायरन वाजला. सायरनला जीपीएस यंत्रणा असल्याने कोणत्या ठिकाणी एटीएम मशीनशी छेडछाड होत आहे व त्या एटीएमपासून कोणते पोलीस स्टेशनजवळ आहे, याची माहिती काही सेकंदात कळते. तेथील कर्मचाºयांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनशी संपर्क केला. त्याचवेळी मुंबईतूनच तंत्रज्ञानाचा वापर करुन एटीएम मशीनमधील लाल सिग्नल सुरु केला. यावेळी आवाजही झाल्याने चोरट्यांना त्याची जाणीव झाली, त्यामुळे त्यांनी लागलीच तेथून पळ काढला. ठाणे अंमलदार दिनकर खैरनार यांनीही क्षणाचाही विलंब न करता रात्री गस्तीचे अधिकारी संदीप पाटील यांना घटनेची माहिती दिली. मोहाडी रोड परिसरात गस्तीवर असलेले पाटील यांनी तत्काळ धाव घेतली. त्यापाठोपाठ रामकृष्ण पाटील, विजय नेरकर, गोविंदा पाटील, रवींद्र चौधरी, सिध्देश्वर डापकर व हेमंत कळसकर आदींचे पथकही दाखल झाले, मात्र तोपर्यंत संशयित चोरटे पसार झालेले होते.रात्री संपूर्ण शहरात नाकाबंदीया घटनेच्या पार्श्वभूमीवर उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती देत शहरात आपआपल्या हद्दीत नाकाबंदी करण्याची विनंती केली, त्यानंतर नियंत्रण कक्षातून सर्वच पोलीस ठाण्यांना नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या. पांढºया रंगाची कार व संशयितांचेही वर्णन यावेळी देण्यात आले. संदीप पाटील व सहकाºयांनी पहाटे पाच वाजेपर्यंत शहरात संशयितांचा शोध घेतला, मात्र ते हाती लागले नाहीत. स्टेशन डायरीला या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.यापूर्वीही घडल्या आहेत घटनागेल्या दोन वर्षात एटीएम लांबविण्याच्या असो की एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाºया अनेक घटना घडल्या आहेत. महामार्गावर तरसोद फाट्याजवळ एटीएम फोडण्यात आले होते. त्यानंतर लगेच दादावाडी परिसरातही एटीएम लांबविण्याचा प्रयत्न झाला होता. जळके येथे तर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. यावल व चोपडा तालुक्यातही अशा घटना घडल्या होत्या. तेव्हा देखील तपासात कोणताच धागा गवसला नव्हता. एटीएम लांबविणारी व फोडणारी स्वतंत्र टोळी कार्यरत आहे.
एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताच मुख्य कार्यालयात वाजला सायरन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:05 PM