लोकमत न्यूज नेटवर्ककजगाव (जि. जळगाव) : दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी वारंवार चकरा मारूनही कुठेच दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतप्त दिव्यांग तरुणाने आपल्याकडील सर्व मूळ कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली.
भरत महादू वाघ (३५, रा. कजगाव, ता. भडगाव) असे या बेरोजगार तरुणाचे नाव आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्याने म्हटले आहे की, शासनाने दिव्यांगांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तो शासकीय कार्यालयांत चकरा मारत आहे ; परंतु शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे त्या योजनांचा लाभ योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. तसेच अनेक दिव्यांग तरुण हे अनुदान मिळावे, यासाठी अनेक कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत आहेत. सर्वच ठिकाणी निराशा पदरी पडत असल्याने हताश झालेल्या या दिव्यांग तरुणाने नैराश्येतून मूळ कागदपत्रे जळगावच्याजिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जमा केली आहेत.