जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ दिवसागणित कोरोना लागण झालेल्या रूग्णांचा आकडा हा वाढत असून परिस्थिती आवाक्यात आणत असताना प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. शुक्रवार नंतर पुन्हा शनिवारी नवीन ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर १५, रावेर, पारोळा प्रत्येकी १०, एरंडोल ०८, भुसावळ, अमळनेर प्रत्येकी ०६, धरणगाव ०४, यावल, पाचोरा, जामनेर प्रत्येकी ०३,जळगाव ग्रामीण, बोदवड, इतर जिल्ह्यातील प्रत्येकी ०२ तसेच चाळीसगाव ०१ रूग्णांचा रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १७२८ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.अशी आहे बाधितांची संख्याजळगाव शहर - ३१२भुसावळ - ३०९अमळनेर - २२८रावेर - १२६चोपडा- ११८भडगाव - ९३यावल - ९२पारोळा- ८६धरणगाव - ८४जामनेर - ८३जळगाव ग्रामीण- ५४एरंडोल - ५१पाचोरा- ४३चाळीसगाव - १८बोदवड- १४मुक्ताईनगर - १४बाहेरील जिल्ह्यातील- ०६