जळगाव : शहरातील बाधित व बाधितांचे होणारे मृत्यू हे थांबतच नसल्याचे चित्र आहे़ सातत्याने बाधितांचे मृत्यू होत असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहे़ शहरात पुन्हा १९९ बाधित आढळून आले असून पाच बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे़ मृतांची संख्या १८२ वर पोहोचली आहे़ शहरातील काही नवीन भागात नियमित संसर्ग वाढत असल्याचे रुग्ण आहेत़गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे़ होणाऱ्या चाचण्यांमध्ये तीस ते पत्तीस टक्के रुग्ण बाधित आढळून येत आहेत़ सोमवारी ३२८ रुग्ण आढळून आले होते़ मंगळवारी पुन्हा १९९ रुग्णांची नोंद झाली आहे़ रुग्णसंख्या ७८०० वर पोहोचली आहे़ तर मंगळवारी ११३ रुग्णांना घरी सोडण्यात आले़ सद्यस्थितीत शहरातील २३५७ रूग्ण उपचार घेत आहेत.
४० वर्षीय पुरूषाचा मृत्यूशहरातील पाच बाधितांसह जिल्हाभरात तब्बल १७ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ यात अमळनेर तालुक्यातील एका चाळीस वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे़ यासह जळगाव शहरातील ५६, ६४, ८० वर्षीय पुरूष तर ५८ व ७२ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे़ यासह तालुक्यातील ३, रावेर व चाळीसगाव तालुका प्रत्येकी २, एरंडोल, भुसावळ, चोपडा, धरणगाव या तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे़
रुक्मीणी नगरात संसर्ग वाढलाशहरातील रुक्मीणीनगरमध्ये ९ जण बाधित आढळून आले आहेत़ यानंतर पिंप्राळा ६, हरि ओम नगर ६, वाघनगर ५, चौघुले प्लॉट ५, शिवाजी नगर ४,मुक्ताईनगर ४, रायसोनी कॉलनी, रामेश्वर कॉलनी, नूतन वर्षा कॉलनी, व्यंकटेश नगर या भागात प्रत्येकी तीन, शाहू नगर, राकेश नगर, पार्वतीनगर, रामानंद नगर, समर्थ कॉलनी, जुने जैन पाईप, जीवननगर, मुंदडा हिल, निसर्ग कॉलनी या भागात प्रत्येकी २, रिंगरोड, सानेगुरूजी कॉलनी, भवानी पेठ, खासगी रुग्णालय, तळेले कॉलनी, तुकाराम वाडी, सत्यम पार्क, महावीर नगर, खोटेनगर, मेहरूण, लक्ष्मीनगर, द्वारकानगर, दादावाडी, टॅगोर नगर, ओमशांतीनगर, गणपतीनगर, विठ्ठल पेठ, जोशीपेठ या भागात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत़