यावल, जि.जळगाव : येथील अपात्र नगरसेवकांविरुद्ध नगरविकास राज्यमंत्र्यांकडे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.येथील पालिकेच्या गटनेत्यांचे पक्षादेश झुगारल्याच्या कारणावरून शहर विकास आघाडीचे नगरसेवक सुधाकर धनगर व महर्षी व्यास शहर विकास आघाडीच्या नगरसेविका रेखा युवराज चौधरी यांना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बुधवारी अपात्र घोषित केल्याने या निर्णयामुळे व्यथित नगरसेवकांकडून नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे अपील दाखल करून स्थगिती मिळवण्याची शक्यता लक्षात घेता शुक्रवारी शहर विकास आघाडीचे गटनेते अतुल पाटील व महर्षी व्यास शहर विकास आघाडीचे गटनेते राकेश कोलते यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे कॅव्हेट अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, व्यथित नगरसेवकासह सत्ताधारी गटाचे काही नगरसेवक मुंबईतच असून त्यांचे अपील मात्र आज दाखल होऊ शकले नसल्याची माहिती मिळाली आहे.जानेवारीमध्ये येथील पालिकेच्या विविध विषय समितीच्या सभापती निवडीसाठी झालेल्या निवडणूकप्रसंगी शहर विकास आघाडीचे नगरसेवक सुधाकर धनगर यांनी गटनेते व माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांचा, तर महर्षी व्यास शहर विकास आघाडीच्या नगरसेविका रेखा युवराज चौधरी यांनी गटनेते राकेश कोलते यांनी बजावलेले पक्षादेश झुगारल्याने दोन्ही गटनेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र याचिकेव्दारा नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी बुधवारी सुधाकर धनगर व रेखा चौधरी यांना अपात्र केले आहे.जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाविरोधात व्यथित नगरसेवकाकडून नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपील दाखल करून स्थगिती मिळविण्याची शक्यता लक्षात घेता अर्जदार अतुल पाटील व राकेश कोलते यांनी शुक्रवारी राज्यमंत्री नगर विकास यांच्याकडे कॅव्हेट दाखल केले आहे.दरम्यान, उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले व व्यथित नगरसेवक अपील दाखल केरण्यासाठी गेले आहेत. मात्र काही कारणास्तव त्यांचे अपील आज दाखल होऊ शकले नसल्याची माहिती आहे.
यावल येथील अपात्र नगरसेवकांविरुद्ध नगरविकास राज्यमंत्र्यांकडे कॅव्हेट दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:13 AM
यावल येथील अपात्र नगरसेवकांविरुद्ध नगरविकास राज्यमंत्र्यांकडे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे व्यथित नगरसेवकासह सत्ताधारी गटाचे काही नगरसेवक मुंबईतचअपील मात्र आज दाखल होऊ शकले नाही