शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

भुसावळ येथे अग्नि तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 1:21 AM

लाखोंचे नुकसान : कलर पेंटच्या दुकानाला अचानक आग

ठळक मुद्देआगीमुळे शॉर्टसर्किट होऊ नये यासाठी प्रसंगावधान राखून लगेच वीजपुरवठा खंडित करण्यात आला. घटनेची माहिती मिळतात डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले. तसेच राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते यांनाही घटनास्थळ गाठले व शक्य ते मदतकार्य केले.भुसावळ पालिकेचे चार अग्नी बंब येऊनही आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण असताना शेजारील तालुक्यातही घटनेची माहिती कळवूून तेथूनही अग्नी बंब पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.सलग दुसऱ्या दिवशी आग लागली आहे. १५ रोजी रेल्वे क्वार्टरमध्ये आग लागून नुकसान झाले होते.

भुसावळ, जि.जळगाव : येथील बाजारातील ब्राह्मण संघाच्या जवळ असलेल्या राजलक्ष्मी पेंट अ‍ॅण्ड डिस्ट्रीब्यूटरच्या दुकान व गोडावूनला आग लागल्याने यात लाखो रुपयांचे पॅण्ट जळून खाक झाले, ही घटना रविवारी रात्री दहा ते पावणे अकराच्या सुमारास घडली.बाजारातील ब्राह्मण संघाजवळ असलेले चार मजली कलर पेंटचे दुकान व गोडावूनला अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील लाखो रुपयांचे पेंटचे डबे जळून खाक झाले. पेंटच्या डब्यांमध्ये गॅस असल्यामुळे एखाद्या सिनेमाला शोभेल अशा पद्धतीचे आगीचे आकाशात दूरवर धुराचे लोट निघत होते. आगीने क्षणातच रुद्र रूप धारण करून दोन मजलेपर्यंत वेढले होते. ही घटना समजताच जवळच वाल्मीक नगरचे पैलवान पुत्र ग्रुपचे तरुण वर्ग तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरसेवक निर्मल कोठारी यांनी पालिकेत अग्नीबंबाच्या विभागाला माहिती कळविली. क्षणातच चार अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले.आगीचे मोठे लोणचे लोण पसरत असताना सभोवतालच्या रहिवाशांना याचा धोका निर्माण होऊ नये याकरिता त्यांना त्वरित घरातून बाहेर निघण्याचा व सतर्कतेचा इशारा देण्यात आला.रात्रभर सोशल मीडियावर आग कुठे लागली, किती नुकसान झाले? परिस्थिती कशी आहे? घटनास्थळी कोण आहे? कुणाला नुकसान तर नाही झाले? नेमकी कशामुळे आग लागली असेल अशा अनेक प्रश्नांची माहिती घेण्यासाठी रात्रभर सोशल मीडियावर संदेश पाठवले व चौकशी केली जात होती. 

टॅग्स :fireआगBhusawalभुसावळ