ऑनलाइन लोकमत
अट्रावल (भुसावळ), दि. 18 - जागृत मुंजोबा देवस्थानावर शनिवारी दुपारी १.२० वाजता मुंजोबाने अग्निडाग घेतला. मुंजोबाने अग्निडाग घेतल्याची माहिती परिसरातील पसरल्यानंतर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
माघ महिन्यामध्ये या देवस्थानावर मोठी यात्रा भरते. यंदा मुंजोबाचे चार वार होते तर देवस्थानावर दुरदुरचे भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. त्यांनी आणलेला नैवेद्य, तुप, लोणी हे मुंजोबा महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर भाविक लोणी मुंजोबाला अर्पण करतात व माघ महिन्याच्या पौर्णिमेपासून ते सव्वा महिना होतील या कालावधीनंतर व पुढच्या येणाऱ्या पौर्णिमेला मुंजोबा महाराज अग्निडाग घेतात, अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे.
१८ रोजी मुंजोबा देवस्थानावर देवस्थानाचे पुजारी प्रभाकर महाराज नित्यनियमाप्रमाणे मंदिरात बसलेले असताना ठिक १.२० मिनिटांनी मुंजोबाने अग्निडाग घेतला. दर्शनासाठी ग्रामस्थ व भाविकांनी एकच गर्दी केलेली दिसत होती.