शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ‘अग्निहोत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:26 PM

डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले : जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा, मन समृध्द करणारा हा तर महामार्ग

जळगाव : अग्निहोत्र हा मन समृद्ध करण्याचा महामार्ग आहे. तणावमुक्त व आरोग्य संपन्न समाज यातून घडत आहे, असे मत अक्कलकोट येथील विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवले यांनी व्यक्त केले.नुकत्याच आयोजित केलेल्या सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दिली. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. ‘अग्निहोत्र’चे फायदे, तसेच प्रदूषण रोखण्यासाठी ‘अग्निहोत्र’चा कसा फायदा होतो, याबाबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्याशी झालेला हा संवाद.

प्रश्न : अग्निहोत्र म्हणजे काय? ते केव्हा करावे?उत्तर : सूर्र्यचक्रानुसार पृथ्वीचे परिचालन होते. सूर्य हा सृष्टीचा महत्वाचा घालक आहे. सूर्याच्या अस्तित्वाशिवाय सृष्टीची कल्पनादेखील आपण करू शकत नाही. म्हणून सूर्याच्या तालचक्रावर मन:शांतीसाठी सूर्योदय व सुर्यास्तावेळी कृतज्ञतापूर्वक आहुती देणे म्हणजे अग्निहोत्र होय. अग्निहोत्र हा दैनंदिन केला जाणारा एक यज्ञ आहे. सूर्योदय व सूर्यास्तावेळी घरामधील वातावरण पवित्र करण्यासाठी अग्निहोत्र यज्ञ केला जातो. आयुर्वेदानुसार अग्निहोत्रामुळे अनेक व्याधींवर मात करता येते आणि जीवन आरोग्यसंपन्न होते.

प्रश्न : अग्निहोत्र संकल्पना जगासमोर मांडण्याची सुरुवात आपण कशी केली?उत्तर : आज प्रत्येक मानव कोणत्या ना कोणत्या तणावाखाली जगत आहे. केवळ ताणतणाव वाहून नेण्यासाठीच आपले जीवन नाही तर मन व बुद्धी तणावरहित करून जीवनातील संकटांना मुक्तपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी दत्त परंपरेने आम्हाला अग्निहोत्र दिले. याद्वारे मानव मानसिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यातून या कायार्ची सुरुवात केली.

प्रश्न : धावपळीच्या जीवनात तरुणांनी आपली कर्तव्ये व अध्यात्म यांची सांगड कशी घालावी?उत्तर : तारुण्यावस्था हा आयुष्याला कलाटणी देणारा काळ असतो. या अवस्थेत मन पुष्ट केल्यास उदंड सामर्थ्य मिळते. उज्वल भवितव्य घडविण्यासाठी तसेच जीवनात येणाऱ्या समस्यांचा लढा देण्यासाठी दररोज थोडा वेळ देऊन अग्निहोत्र करावे. यातून कौटुंबिक वातावरण पवित्र होते. तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे. आज कित्येक तरुण नैराश्यातून आत्महत्या करतात. ही बाब अत्यंत खेदजनक असून मिळालेल्या सुंदर जीवनातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायला हवा.

प्रश्न : अग्निहोत्रातून पर्यावरण संतुलन कसे राखले जाते?उत्तर : ज्या ठिकाणी सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम होतात तिथे याबाबत संशोधनासाठी उपकरणे मुंबई येथील एका संस्थेने ठेवलेली असतात. यातून पर्यावरण शुद्धी कशी होते हे संशोधनाअंती जाहीर करणार आहे.अध्यात्म म्हणजे केवळ परंपरांचे अनुकरण नव्हे. प्रत्येक धार्मिक उत्सवातून जीवनात बदल घडावा, हा उद्देश आहे. जीवन हे केवळ कालचक्र नसून ते कर्म आणि परमार्थ यांची सांगड घालून प्रत्येक क्षण सत्कारणी लावण्यासाठी जगायला हवे. जीवनात मन:शांती व समाधान हवे.-डॉ. पुरुषोत्त राजीमवले

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव