जळगाव : महाबळ चौकातील मानस प्लाझा मध्ये तिसºया मजल्यावर अॅड. सरोज दिलीप लाठी यांच्या बंद घराला शनिवारी सकाळी ९ वाजता अचानक आग लागली. त्यामुळे मोठा अग्नितांडव निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले होते.अवघ्या दहा मिनिटात अग्निशमन बंब पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. इमारतीवर असलेल्या मोबाईल अन्यथा टॉवरपर्यंत आग पोहचून मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान, या आगीत घरातील टीव्ही, एसी, पंखे या इलेक्ट्रॉनिक वस्तूसह लाकडी कपाट, गाद्या व कपडे जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके आगीच कारण कळू शकलेले नाही, मात्र शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकारी दिलीप लाठी हे त्यांची पत्नी अॅड. सरोज लाठी व मुलासह या इमारतीत वास्तव्यास आहे. अॅड. सरोज लाठी या जळगाव न्यायालयात काम करतात.मुलगा विकास सोबत राहतो तर दुसरा मुलगा विपुल नोकरीनिमित्ताने हा नाशिकला राहतो. अॅड लाठी या पतीसोबत तीन ते चार दिवसांपूर्वी नाशिकला गेलेल्या आहेत. त्यामुळे घर बंद होते. आगीची माहिती मिळताच अवघ्या सहाच मिनिटात अग्निशमन बंबासह अग्निशमन अधिकारी शशीकांत बारी, रोहीदास चौधरी, अश्वजीत घरडे, प्रकाश चव्हाण, प्रदीप धनगर यांनी घटनास्थळ गाठले. आगीचे स्वरुप पाहताच कर्मचाºयांनी घराचे कुलुप तोडून मागच्या बाजूने पाण्याचा मारा केला. काही वेळातच आग नियंत्रणात आणली.अॅड. लाठी यांच्या घराच्या वर मोबाईलचा टॉवर आहे. आगीमुळे घराच्या छताची पीओपीही नष्ट होवून लोखंडी गज उघडे पडले. जर वेळीच अग्निशमन बंब पोहचला नसता, तर टॉवर पर्यंत आग पोहचून टॉवरही जळाला असता, पूर्ण बिल्डींगला आग लागून दुर्घटना घडली असती. रहिवाशांनी गांभीर्य ओळखत तत्काळ सिलेंडर हलविल्यानेही अनर्थ टळला.
जळगावात वकीलाच्या बंद घरात अग्नितांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 1:16 PM
महाबळ चौकातील मानस प्लाझा मध्ये तिसºया मजल्यावर अॅड. सरोज दिलीप लाठी यांच्या बंद घराला शनिवारी सकाळी ९ वाजता अचानक आग लागली. त्यामुळे मोठा अग्नितांडव निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले होते.अवघ्या दहा मिनिटात अग्निशमन बंब पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. इमारतीवर असलेल्या मोबाईल अन्यथा टॉवरपर्यंत आग पोहचून मोठी दुर्घटना घडली असती.
ठळक मुद्दे महाबळमधील घटना इमारतीवरील मोबाईल टॉवर सुरक्षित लाखो रुपयांचे नुकसान