वाकोद/ मेहुणबारे : जळगाव औरंगाबाद महामार्गावरील वाकोद बस स्थानक परिसरात व कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून असलेल्या संतोष सोनवणे यांच्या सायकल मार्ट व कृष्णा ताठे यांचे इलेक्ट्रिकचे दुकान अशा दोन दुकानांना तर मेहुणबारे येथील रवींद्र ओंकार वाघ व प्रमिला ओंकार वाघ यांच्या शेतात बुधवारी शॉर्ट सर्किटने आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.वाकोद येथे दोन टपरीला आग; दीड लाखाचे नुकसानवाकोद बसस्थानक परिसरात व कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून असलेल्या संतोष सोनवणे यांच्या सायकल मार्ट व कृष्णा ताठे यांचे इलेक्ट्रिकचे दुकान अशा दोन दुकानांना मंगळवारी मध्यरात्री शार्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. संतोष सोनवणे यांच्या सायकल मार्ट च्या दुकानातील कॉम्प्रेसर मशीन, टायर, ट्यूब, सायकलीचे स्पेयर पार्ट सह अनेक महागड्या वस्तू अक्षरश: जळून खाक झाल्या. कृष्णा ताठे यांच्या दुकानातील पंखे, मोटारी, इलेक्ट्रिक वस्तू जळाल्याने या दोघांचे मिळून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले.मेहुणबारे येथे उसाला आगमेहुणबारे गावापासून गिरणा नदी काठावरील २ किलोमीटर अंतरावरील रवींद्र ओंकार वाघ व प्रमिला ओंकार वाघ यांच्या शेतातील उसाला बुधवारी दुपारी २.४० च्या सुमारास वीज तारांच्या शॉर्ट सर्किटने आग लागली. शेतात काम करणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी याची माहिती वीज वितरण विभागाला व शेत मालकांना दिली.यावेळी वीज वितरण विभागाने सतर्कता दाखवत विद्युत पुरवठा बंद केला. परंतु आग विझविण्यासाठी पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने व आग वाढली.
वाकोद व मेहुणबारे येथे अग्नितांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 4:18 PM
जळगाव औरंगाबाद महामार्गावरील वाकोद बस स्थानक परिसरात व कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून असलेल्या संतोष सोनवणे यांच्या सायकल मार्ट व कृष्णा ताठे यांचे इलेक्ट्रिकचे दुकान अशा दोन दुकानांना तर मेहुणबारे येथील रवींद्र ओंकार वाघ व प्रमिला ओंकार वाघ यांच्या शेतात बुधवारी शॉर्ट सर्किटने आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ठळक मुद्देदोन्ही ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आगमेहुणबारे शिवारातील पाच एकरातील ऊस खाक