रत्नापिंप्री, ता. पारोळा : रावल कृषी महाविद्यालय दोंडाईचा येथील विद्यार्थ्यांकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत भिलाली येथे शेती कार्यशाळा घेण्यात आली.
यात प्रामुख्याने कापूस पिकावरील रोग व कीटक व्यवस्थापक या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी बी.के. बोरसे, कृषी सहाय्यक एस. एम. लांडगे, कृषी उद्योजक संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भिलालीचे सरपंच बेबाबाई पाटील, उपसरपंच भीमाबाई कोळी, ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, विजय पाटील, विश्वास भिल, ज्योती पाटील, शीतल पाटील, गावातील शेतकरी आनंदा पाटिल, रमेश पाटील, लोटन पाटील, रावसाहेब पाटील, दगडू पाटील, डॉ. डी. आर. पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल पाटील, कार्यक्रम समन्वय प्रा. सूरज चांदुरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुयश साळुंखे यांनी केले.