मुक्ताईनगर, जि. जळगाव : तालुक्यात गुलाबी बोंड अळी नियंत्रणाच्या नावाखाली बोगस कीटकनाशके विकून शेतकºयांची फसवणूक करणाºया विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिला आहे.तालुक्यात कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण करण्याच्या नावाखाली कीटकनाशके विक्रेत्यांकडून शेतकº्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. चुकीची औषधे देऊन शेतकº्यांची फसवणूक केली जात असल्याचे कृषी विभागाच्याही निदर्शनास आले असून अशा कीटकनाशक विक्रेत्यांवर भारतीय अधिनियम १९६८ व कीटकनाशक नियंत्रण आदेश १९७१ नुसार नियमांचे उल्लंघन आढळल्यास परवाना रद्द करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा व्यवहारे यांनी दिला आहे.तब्बल तीन आठवडे पावसाने दांडी मारल्याने कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यावर नियंत्रणाकरीता शेतकरी तालुक्यातील कीटकनाशके विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करून घेऊन जातात परंतु मुक्ताईनगर तालुक्यात बºयाचशा विक्रेत्यांकडे गुलाबी बोंड अळी नियंत्रण औषधांचे उगम प्रमाणपत्र मंजूर नसतानाही ते सरसकट कीटकनाशके सोबत इतर औषधे तसेच विद्राव्य रासायनिक खते, टॉनिक, सूक्ष्म द्रव्य खते इत्यादी मोठ्या प्रमाणात विक्री करून शेतकºयांची लूट करीत आहेत. तसेच या रोगाला नियंत्रण करता लागणारा खर्च हा अत्यल्प असतानासुद्धा त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा खर्चाला बळी पाडले जात आहे.दरम्यान, तक्रारीनंतर कृषी विभागामार्फत वरिष्ठ पातळीवरून तपासणी सुरू असून अधिनियमन १९६८ व कीटक नाशके नियंत्रण आदेश १९७१ नुसार नियमांचे उल्लंघन आढळल्यास कीटक नाशके विक्रेत्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असेही इशाºयात बजावण्यात आले आहे.
बोगस किटकनाशके विकणाऱ्यांवर कारवाईचा कृषी विभागाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:06 AM
मुक्ताईनगर तालुक्यात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून त्यावर नियंत्रणासाठी शेतकºयांची धडपड सुरु आहे. परंतु तालुक्यातील किटकनाशक विक्रेत्यांकडून बोगस औषधींची विक्री होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत असल्याने कृषी विभागाने अशा विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
ठळक मुद्देपावसाने तीन आठवडे दांडी मारल्यामुळे कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव फसवूणक झालेल्या शेतकºयांकडून कृषी विभागाकडे तक्रारी