धरणगाव : तालुक्यात शेतकऱ्यांना खते उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तर काही कृषी केंद चालक हे शेतकऱ्यांकडून खतांची जास्त रक्कम आकारून शेतकºयाची लुट करत असल्याने तालुका काँग्रेस कमिटी तर्फे नियोयित आंदोलन सुरु होण्यापूर्वीच कृषीमंत्र्यांनी दखल घेत तातडीने दूरध्वनीवर संपर्क साधत हा प्रश्न सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना दिले आहे.या प्रश्नी काँग्रेसने कृषी अधिकारी यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. जाहीर केल्याप्रमाणे ६ रोजी आंदोलन सुरु होण्यापूर्वीच कृषी मंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तातडीने यासाठी संयुक्त मिटींग बोलविण्याचे आंगून यातून मार्ग काढण्याचे आदेश दिल्याने आंदोलनकर्त्यांसोबत प्रशासनातील अधिकाºयांनी बैठक घेवून संबधितांना सूचना दिल्या.यासाठी प्रांत अधिकारी विनय गोसावी व तहसीलदार नितीन देवरे यांनी मध्यस्थी करून काँग्रेसचे पदाधिकारी शेतकरी व कृषी केंद्र चालक व कृषी अधिकारी यांची संयुक्त मिटींग घेतली व शेतकºयांना लवकरच सर्व प्रकारचे खत उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. तसेच कृषी केंद्र चालकांना समज दिली.यावेळी तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील यांनी शेतकºयांना खते त्वरित उपलब्ध करून देत साठेबाजी करणाºया व जास्त किमती आकारणाºया कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जिल्हा सरचिटणीस प्रा. सम्राट परिहार यांनी शेतकºयांच्या समस्या मांडल्या. यावेळी तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी , शहराध्यक्ष राजेंद्र न्यायदे, युवक अध्यक्ष गौरव चव्हाण, महेश पवार, मार्केट कमिटी संचालक मनोज कंखरे, विकास लांबोळे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, योगेश येवले, राहुल पवार, सुनील बडगुजर, सिताराम मराठे व शेतकरी उपस्थित होते.
खतांची टंचाई दूर करण्याचे कृषीमंत्र्यांनी दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:31 PM