जळगाव : स्वच्छ भारत अभियानातंर्गत कचरामुक्त शहरांचे रेटींग मंगळवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव शहराला तीन स्टार देण्यात आले असून, नाशिक, अहमदनगर सारख्या मोठ्या शहरांना केवळ एकच स्टार मिळाला आहे. जानेवारी महिन्यात केंद्रीय पथकाने शहराचे सर्वेक्षण केले होते. विशेष म्हणजे याच महिन्यात जळगाव शहरात कचराकोंडीची सर्वात मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मंगळवारी जाहीर झालेल्या कचरामुक्त शहराच्या यादीत जळगावला तीन स्टार मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० अंतर्गत देशभरातील शहरांचे घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विलगीकरण, कचºयाचे संकलन व हगणदरी मुक्तीची स्थिती या आधारावर ६ हजार गुणांच्या सर्वेक्षणाची मोहीम केंद्र शासनाकडून घेण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात सर्वेक्षणाच्या काळातच शहराच्या सफाईसाठी नेमण्यात आलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या कामांबाबत सर्वत्र ओरड होती. घंटागाड्या घरोघरी पोहचत नव्हत्या, त्यामुळे घरांघरांमधून कचºयाचे संकलन चांगल्या पध्दतीने होत नव्हते. त्यामुळे कचरामुक्तीसाठी देण्यात आलेल्या स्टार रेटींगमध्ये तीन स्टार जळगाव शहराला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या तीन आधारांवर करण्यात आले सर्वेक्षणजानेवारी महिन्यात शहरातील कचºयाची स्थितीवर सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये जळगाव शहरातील एकूण जमा होणारा कचरा, घरांमधून संकलन होणाºया कचºयाचे प्रमाण, ओला व सुका कचºयाचे विलगीकरण व एकूण जमा होणाºया कचºयावरील प्रक्रिया या तीन आधारांवर सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार ही रेटींग देण्यात आली आहे.खासगी मक्तेदार नेमून भरून घेतला होते नागरिकांचे अभिप्रायस्वच्छ सर्वेक्षणातंर्गत प्रत्यक्ष ठिकाणांच्या पाहणीसह नागरिकांचे आॅनलाईन अभिप्राय घेतले जात होते.मात्र, मनपाने ७३ लाखांची निविदा काढून स्वच्छ भारत अभियानासाठी नागपूर येथील नेमण्यत आलेल्या कंपनीवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. संबधित कंपनीनेही काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मनपाच्या प्रवेशव्दाराजवळ बसवून येणाºया-जाणाºया नागरिकांचे नाव व मोबाईल नंबर घेवून स्वत:च हे अभिप्राय घेतले जात होते. याबाबतचा भांडाफोड जानेवारी महिन्यात ‘लोकमत’ ने केला होता.शहराच्या कचरामुक्तीच्या रेटींगमध्ये वाढ ही मनपा सफाई कर्मचाऱ्यांची मेहनत आहे. तसेच तत्कालीन आयुक्त उदय टेकाळे आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे हे यश आहे. भविष्यात अजून शहराच्या स्वच्छतेचा प्र श्न मार्गी लावून, देशातील पहिल्या २० शहरांमध्ये जळगाव शहराचे नाव आणण्याचा प्रयत्न असेल.-भारती सोनवणे, महापौरशहरात कचºयाची समस्या असताना सर्वात जास्त असताना कचरामुक्तीसाठी शहराला मिळालेल्या स्टारबाबत शंका निर्माण होते. जर खरोखरच आपल्या मेहनतीने हे स्टार मिळवलेले असते तर त्याला यश म्हणता येईल. तरीही ज्या सफाई कर्मचाºयांनी मेहनत केली त्यांचे अभिनंदन आहे. कारण त्यांच्यामुळेच शहराला हे एवढे यश मिळवता आल. मात्र, समिती येईल तेव्हाच स्वच्छता करण्यापेक्षा वर्षभर स्वच्छता करण्याची गरज आहे.-डॉ.अश्विन सोनवणे, उपमहापौर
अहो आश्चर्यम.: कचरामुक्तीसाठी शहराला तीन स्टार, अन्य शहरांना केवळ एक स्टार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 12:00 PM