आॅनलाईन लोकमत
अजय पाटील,
जळगाव-दि.९, अभियांत्रिकी व औैषधनिर्माण शास्त्राकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता, मध्यंतरी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने(‘एआयसीटीई)विविध महाविद्यालयांना अनेक अभ्यासक्रम सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र देशभरात महाविद्यालयांच्या वाढत्या संख्येमुळे या अभ्यासक्रमांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ‘एआयसीटीई’ ने देशभरातील १ हजार ३५४ अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्राचे अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतलाआहे. यामध्ये खान्देशातील १४ महाविद्यालयातील २५ अभ्यासक्रम बंद करण्यात आले आहेत.
देशभरात बंद करण्यात आलेल्या १ हजार ३५४ अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक ४०१ अभ्यासक्रम हे महाराष्ट्रातील महाविद्यालयांमधीलआहेत. यामध्ये खान्देशातील १४ महाविद्यालयांमधील २५ अभ्यासक्रम आहेत. यामध्ये सर्वाधिक १३ अभ्यासक्रम हे तंत्रनिकेतनचे आहेत. तर अभियांत्रिकीचे ८, औषधनिर्माण शास्त्राचे ३ व मॅनेजमेंटच्या एकाअभ्यासक्रमाचा समावेश आहे. खान्देशातील१४ महाविद्यालयांमध्ये ६ महाविद्यालये हे धुळे जिल्'ातील तर ८ महाविद्यालये जळगाव जिल्'ातील आहेत.
काय आहे बंद होण्याचे कारण?‘एआयसीटीई’कडून अभियांत्रिकी व औषधशास्त्र महाविद्यालय अथवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी मागितली तर ती आॅनलाइन देण्याची पध्दत सुरू केली होती. यात महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयात एआयसीटीईच्या प्रोसेस बुकनुसार सर्व सुविधा असल्याचे प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक होते. त्यानुसार असे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर एआयसीटीई विशेष चौकशी न करता अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली.सध्यस्थितीत या अभ्यासक्रमांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयाकडूनच ‘एआयसीटीई’कडे अभ्यासक्रम बंद करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते. ज्या अभ्यासक्रमांमध्ये सलग पाच वर्षे ३० टक्के प्रवेश होत नाही असे अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय ‘एआयसीटीई’ ने घेतला आहे.
इन्फो-महाविद्यालये व त्यांच्यातील बंद करण्यात आलेले अभ्यासक्रमजळगाव-महाविद्यालय - वर्ग - बंद करण्यात आलेला अभ्यासक्रमजी.एस.रायसोनी मॅनेजमेंट - एम.सी.ए.- कॉम्प्युटर इन अप्लीकेशनजी.एस.रायसोनी डिप्लोमा कॉलेज- तंत्रनिकेतन- सिव्हील व मॅकेनिकलसंत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, भुसावळ-पदवी-सिव्हील व मॅकेनिकलजे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय, फैजपूर- पदवी- सिव्हीलसुरेशदादा जैन फार्मास्युटीकल कॉलेज, जामनेर-पदव्युत्तर - क्वॉलीटी अॅसुरन्सगुलाबराव देवकर अभियांत्रिकी-पदवी दुसºया वषार्साठी- आॅटोमोबाईल इंजिनिअरींगशरदचंद्रिका सुरेश पाटील डिप्लोमा कॉलेज, चोपडा-डिप्लोमा -इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनीकजे.टी.महाजन डिप्लोमा कॉलेज, फैजपूर- डिप्लोमा- कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी २ विषय व इंजिनिअरींग कम्युनिकेशन
धुळेएच.आर.पटेल फार्मास्युटीकल कॉलेज-पदवी - बायोफार्मास्युटीकल व इंडस्ट्रीयल फार्मसीगंगामाई पॉलिटेक्निक कॉलेज, धुळे - डिप्लोमा - इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक व इन्स्ट्रूमेंट इंजिनिअरींग, संजय एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक- डिप्लोमा - इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनबापुसाहेब शिवाजीराव देवरे डिप्लोमा कॉलेज- डिप्लोमा - इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीचे २ विषय व इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिकबापुसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी - पदवी- सिव्हील, कॉम्युटर अॅनालिसीस व कम्युनिकेशन इंजनिअरींगआर.सी.पटेल महाविद्यालय - पदवी - मॅकेनिकल