जळगाव - महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडून जिल्ह्यात केवळ जळगाव शहरातील नवीन बी.जे.मार्केट, गिरणा टाकी परिसर व एमआयडीसी या तीन भागातूनच हवेची गुणवत्ता तपासली जात आहे. एकीकडे हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण वाढत जात आहे. मात्र, हवेची गुणवत्ता केवळ जळगाव शहरातीलच तपासली जात आहे. तसेच हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी कायम स्वरुपी कोणतेही यंत्र देखील बसविण्यात आलेले नाही. प्रदूषण महामंडळाने विद्यापीठाला ही गुणवत्ता तपासण्याचे काम दिले आहे. प्रत्यक्ष ठिकाणावर जावून यंत्रे हाताने हाताळून ही तपासणी केलीजात आहे. जळगाव शहरातील ही प्रणाली १० ते १२ वर्ष जुनी आहे. दरम्यान,लवकरच नवीन प्रणाली विकसीत केली जाणार असून, जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा व पाचोरा या शहरात देखील हवेची गुणवत्ता तपासण्याचे काम सुरु होणार आहे.
जिल्ह्यात केवळ तीन ठिकाणाहून तपासली जाते हवेची गुणवत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:40 AM