- कुंदन पाटील
जळगाव : मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा कुणाच्या मनात नसते. अजित पवार मात्र सर्वार्थाने अनुभवी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेतच, अशी शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी येथे भूमिका मांडली. गतकाळात मात्र तोडफोड करुन लायकी नसलेलेही मुख्यमंत्री झालेत, अशी पुष्टी जोडत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा घेतला.
रविवारी उद्धव ठाकरे हे जळगाव दौऱ्यावर येत आहेत, त्यापार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी राऊत शुक्रवारी रात्री जळगावात आले.शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.संपर्क प्रमुख संजय सावंत यावेळी उपस्थित होते. तेव्हा ते श्रीखंड-पुरी खाण्यात मग्न खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या गौरव सोहळ्यात ‘श्री’भक्त उन्हामुळे तडफडत होते आणि मुख्यमंत्र्यांसह जबाबदार मंडळी ‘एसी’त बसून श्रीखंड-पुरी खात होते.
तिथला मृतांचा आकडा भयानक आहे. तो आकडा दडवला जात आहे.पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली. तेव्हा देवेंद्र फडणवीस राज्य सरकारविरोधात आग ओकत होते. सरकारने मात्र मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत हल्लाखोर ग्रामस्थांवर गोळीबार केला. मग खारघरच्या घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांकडे स्क्रिप्ट वाचण्याचे काममुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे असतात, याची कुणालाही कल्पना नसते. राज्याच्या विकासाचा प्रश्न सोडून ते राजकीय वचप्यासाठीच सभा आणि कार्यक्रम घेत फिरतात. भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचण्याचीच जबाबदारी त्यांच्यावर आहे, असा टोला त्यांनी लगावला.
‘गुलाबो गॅंग’पाहिला का?ठाकरेंच्या सभेत घुसण्याचा इशारा देणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर राऊतांनी जहरी टीका केली. पळकुटे म्हणतात, ठाकरेंच्या सभेत घुसेन म्हणून. मी आता जळगावात घुसलोय. मला त्यांचा एक उंदीर दिसला नाही. आम्ही निधड्या छातीचे आहोत. नेते म्हणविणारे हे नुसते भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट आहेत. नुसती दाढी-मिशी असून चालत नाही.चांगल्या मिशा तर कुख्यात आतिक अहमदलाही होत्या. तुम्ही ‘गुलाबो गॅंग’ पाहिला का, असा सवाल करुन त्यांनी मंत्री पाटील यांना चिमटा घेतला.
'मी होतो रुग्णालयात'पाचोऱ्याचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले होते. जेव्हा आर.ओ.पाटील कोम्यात गेले, तेव्हा मी स्वत: रुग्णालयात हजर होतो. ‘मातोश्री’वरुन सातत्याने डॉक्टरांशी संपर्क सुरु होता. ठाकरेंच्या सभेची धास्ती घेतल्याने आमदार किशोर पाटील यांनी ही दिशाभूल केल्याचा दावा राऊत यांनी केला. आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना फारसे गांभिर्याने घ्यायचे नसते, असेही ते म्हणाले.