राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित गट असे न लिहिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे लिहावे कारण राष्ट्रवादी पक्ष हा आपला पक्ष आहे, असं मंत्री अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवावी यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. चोपडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा घेऊन पाडळसे धरणाचा फायदा कोणाकोणाला होईल, हे विरोधकांपर्यंत पोहोचवायचे आहे, असं अनिल पाटील म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत असे सांगितले. यावर मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत आणि तेच राहणार आणि देशात त्यांच्या नेतृत्वाखाली काम चालणार, असं प्रत्युत्तर अनिल पाटील यांनी दिलं.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक पदयात्रा काढत असल्याचे विचारल्यावर, अनिल पाटील यांनी सांगितले विरोधकांना काही काम नाही. पदयात्रा काढून शेतकऱ्यांच काही भलं होईल असं मला काही वाटत नाही. सरकार सक्षम आहे सरकार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आज पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत अकाऊंटपर्यंत पोहोचलेले आहेत. सरकारने दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेलं सरकार आहे. त्यामुळे कितीही पदयात्रा काढल्या तरी काय उपयोग नाही, अशी टीका अनिल पाटील यांनी केली.