महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शेख अक्रम शेख इस्माईल तेली यांची नियुक्ती करत असल्याचे पत्र अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मोहम्मद खा. पठाण यांनी प्रस्तुत केले आहे. राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल, विधिमंडळ गटनेते व उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे नियुक्तिपत्र देण्यात आले.
पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेख अकरम शेख इस्माईल तेली यांचे सहकार्य राहील, असा विश्वास ॲड. मोहम्मद खा. पठाण यांनी पत्रातून व्यक्त केला आहे.
याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मोहम्मद खा. पठाण उपस्थित होते.