शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

अक्षय्यतृतीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:15 AM

- प्रा.डॉ.उषा सावंतअहिराणी भाषिक परिसरात अक्षयतृतीयेला गौराईची पूजा करतात. चैत्र महिन्याच्या चावदसला (चतुर्दशी) खान्देशात ग्रामीण भागात घरोघरी गौर मांडली जाते. सासुरवाशिणी या उत्सवाला माहेरी येतात. अहिराणीत गौराईला गवराई म्हणतात. गौराई पार्वतीचे रूप आहे. गौर लाकडाची केलेली असते. गौराई ज्या कोनाड्यात किंवा पाटावर मांडतात तेथे मागच्या भिंतीवर रंगीत नक्षीकाम व चित्रे ...

- प्रा.डॉ.उषा सावंतअहिराणी भाषिक परिसरात अक्षयतृतीयेला गौराईची पूजा करतात. चैत्र महिन्याच्या चावदसला (चतुर्दशी) खान्देशात ग्रामीण भागात घरोघरी गौर मांडली जाते. सासुरवाशिणी या उत्सवाला माहेरी येतात. अहिराणीत गौराईला गवराई म्हणतात. गौराई पार्वतीचे रूप आहे. गौर लाकडाची केलेली असते. गौराई ज्या कोनाड्यात किंवा पाटावर मांडतात तेथे मागच्या भिंतीवर रंगीत नक्षीकाम व चित्रे काढून अनेक प्रकारे सजवतात. गौराईला बाशिंग बांधतात. तिलाही सजवतात. मुली टिपऱ्या घेऊन व डोक्यावर तांब्या घेऊन नदीवर जातात. नदीवर गाणी गातात -तापी काठनी चिकनमातीइना वट्टा बांधु व।हवु वट्टा चांगल्या तेत्यावर सोजी दयू व।हाई सोजी चांगली तेसांजोºया करू व।त्या सांजोºया चांगल्या तेगौराईले देऊ व।त्या सांजोºयागौराईले देऊ व।गौराई उनी माहेरले तेआपन गाना गाऊत व।मुली तांब्यात नदीचे पाणी भरतात. वरती आंब्याची पाच पाने ठेवून त्यावर कैरी ठेवतात. त्या आंब्याला डवना म्हणतात. मुली गातात -याही भाऊ तुले मी गावूवाटवर आंबा नको लावूमनी गवराई लेकुरबाईआंबानी रोंदय व्हुईकढी उकाऊ मढी उकाऊये रे संकर जेवालेगवराई उनी लेवाले।डोक्यावर तांब्या घेऊन येताना त्या गाणी गातात -आथा आंबा तथा आंबाकैरी झोका खाय व।कैरी पडनी दगड फुटनापानी झुय झुय वहाय व।तठे रतन धोबी धोयतठे कसाना बाजार व।रतन धोबी धोयतठे तोंडास्ना बाजार व ।माये माले तोडा ली ठिवजो वबंधूना हते धाडजो व ।तोड्याच्या ऐवजी अनेक दागिन्यांची नावे घेऊन गातात -नावे गोवून उदा. साखळ्या, चितांग, बजटीक, पुतळ्या, गाढले, एकदाणी इ. गीत लांबत जाते. पुन्हा दागिन्यांच्याच संदर्भात दुसरे गीत गातात -आथी आमराई, तथी आमराईमधमा पानी वहाय व ।तठे मनी गवराई काय काय इसरनी वतठे मनी गवराई पाटल्या इसरनी वगौराईचा स्वयंपाक झाल्यावर टिपºयांच्या तालावर मुली गातात -हारा ठेवू, घाºया रांधूये व गवराई जेवालेगवराई बसनी जेवालेतो संकर उना लेवालेडेरा ठेवू पुºया रांधूये रे संकर जेवालेसंकर उना जेवाले तोगवराई उनी लेवाले।गौराईच्या उत्सवाला खान्देशात घरोघरी झोके बांधतात. घरासमोरच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर बसून दोघी जणी गातात -पाटलावरनं नारयनारय खुय खुय वाजे।तठे मनी गवराईलेगवराईले काय काय जाते।पुन्हा याही गीतात अनेक अलंकारांची नावे गोवली जातात. प्रत्येक गीतात चाल व आशय भिन्न असतो. उदा -दारे सोनाना पिप्पय व माय,सोनाना पिप्पय...।त्याले काय चांदीन्या हालकड्याव माय चांदीना हालकड्या।त्याले काय सोन्याना पायनाव माय, सोनाना पायनात्याले काय रेसमनी दोरीत्यावर बसनार कोनता हरीत्याला झोका देनार गवराई नारीव माय गवराई नारी।गवराई हे पार्वतीचे रूप आहे. गौर वर्ण असलेली ती गौर. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी रात्री मुली सर्व गौराया एकत्र एके ठिकाणी जमतात. रात्रभर टिपºयांच्या तालावर तसेच झोक्यांवर गीते गातात. यालाच गौर जागवणे म्हणतात. अक्षय्यतृतीयेच्या दुसºया दिवशी म्हणजे बाशी आखाजीला गवराई विसर्जन करतात. त्या दिवशी दुपारी नदीच्या रस्त्याच्या किंवा रेल्वे रुळाच्या अल्याड पल्याड गावातल्या मुली नदी रस्ता किंवा रूळ यांच्या अल्याड पल्याड उभे राहून भांडतात. दोन्ही गावातील सगळी बायामाणसे हा सोहळा बघायला येतात. या सोहळ्याला ‘बार खेळणे’ असे म्हणतात. अहिराणी परिसरातील अक्षय्यतृतीया गवराईच्या उत्सवासह साजरी होते. गवराई ही उत्सव देवता आहे. सासुरवाशिणीला माहेरी यायला मिळते ते गवराईमुळे. म्हणून ती म्हणते -उबगेल जीवले, दिवायी आखाजीना आधार।वाट जोयस मायबाई, बंधूले धाड लवकर ।।आखाजीना सन, नका परतावा मुराई।बहिनीना बिगर, भाऊ किलावना जाई।।आखाजीले वाट दखस मायबाई।झोका खेयु, खेयु गवराई।।- (साभार : अहिराणी साहित्यसोनियाच्या खाणी )

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाJalgaonजळगाव