ऑनलाईन नेटवर्क जामनेर (जि. जळगाव), दि. 17 : येत्या तीन दिवसात गावातील अवैध दारू विक्री थांबवा, अन्यथा तुमचे दारूचे डबे बाहेर फेकू, असा गंभीर इशारा गावातील संतप्त महिलांनी दिला आहे. ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुरुवारी सकाळी झाली. त्यात संतप्त महिलांनी दारू विक्रीविरुद्ध एल्गार पुकारला आहे. सामरोद, ता.जामनेर येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्राम पंचायत कार्यालयात झाली. सरपंच श्रीकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या प्रारंभी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेत आयत्या वेळच्या विषयात महिलांनी दारुबंदीचा विषय मांडला. गावात दारू पिणा:यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कुटुंबांमध्ये दररोज भांडण-तंटे होतात. अनेक मद्यपी पुरुष कुटुंबातील महिलांना मारहाण करतात. मानवीयदृष्टय़ा हा प्रकार भयानक व निंदणीय आहे. यातूनच गावात असंतोष पसरत चालला आहे. अशा परिस्थितीत गावातील अवैध मद्य विक्री थांबली पाहिजे. दारू विक्री करणारे सर्व अड्डे बंद झाले पाहिजेत. याबाबतची माहिती पोलीस, महसूल यंत्रणा तसेच दारूबंदी उत्पादन शुल्क यासह संबंधित यंत्रणांना कळविण्यात यावे, असे ग्रामसभेत ठरले. सर्वाचे संसार सुखात राहण्यासाठी हातभार लावावा यासाठी सहकार्य करावे, अशी भूमिका समस्त महिलांनी मांडली. याउपरही दखल न घेतली गेल्यास मद्य विक्री करणा:यांचे थेट डबेच घराबाहेर तसेच दारू अड्डय़ाबाहेर फेकण्याचा निर्धार महिलांनी केला आहे. यासाठी महिलांनी मद्य विक्रेत्यांच्या घरोघरी जावून मद्य विक्री बंद करण्याचा इशारा दिला. या वेळी पोलीस पाटील कडुबा बाविस्कर, महेंद्र कोळी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:33 PM
सामरोद येथे तीन दिवसात दारू विक्री थांबवा, अन्यथा डबे बाहेर फेकण्याचा निर्णय संतप्त महिलांनी घेतला आहे.
ठळक मुद्देगावात दारू पिणा:यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेयअनेक मद्यपी पुरुष कुटुंबातील महिलांना मारहाण करतातमद्य विक्रेत्यांकडे जावून विक्री तत्काळ बंद करण्याचा इशारा