महाराष्ट्रातील 100 वर्षापूर्वीच्या अजात या पंथाच्या जाती व्यवस्था निमरूलनाच्या कार्यावर प्रकाश टाकणारा ‘अजात-जाती अनंताचे एक अज्ञात पर्व’ हा माहितीपट जळगाव शहरात प्रथमच ‘परिवर्तन’तर्फे 11 जून रोजी पीपल्स बँकेच्या मुख्य शाखेतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
‘अजात’ हा माहितीपट अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर या परिसरात 1915 ते 1935 या काळात समाज सुधारक संत गणपती महाराज यांनी केलेल्या जाती निमरूलनाच्या चळवळीचा इतिहास व प्रभावीपणे रावबल्या गेलेल्या कार्याचे अवलोकन करणारा होता. नुकताच या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन चित्रपट महोत्सवात ‘अजात’साठी अरविंद जोशी यांना ‘अवॉर्ड ऑफ मेरिट’ मिळालाय. या महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणारा ‘अजात’ हा एकमेव भारतीय माहितीपट आहे. या वेळी माहितीपटाचे दिग्दर्शक अरविंद जोशी व त्यांचे सहकारी सत्यपालसिंह राजपूत उपस्थित होते. सुमारे 100 वर्षापूर्वी गणपती महाराजांनी विधवेशी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांनी आपल्या शिष्यांनाही आंतरजातीय विवाह करण्याचे आदेश दिले. मंदिर प्रवेश, एकत्रित काला, स्त्रीमुक्ती अशी अनेक कामे त्यांनी त्या काळी केली. स्त्रियांना पितृसत्ताक दास्याचे प्रतीक असलेले कुंकू पुसून टाकायला सांगितले. विवाहित स्त्रियांना मंगळसूत्र, बांगडय़ा काढून टाकायला सांगितल्या. वर्चस्ववादी धर्मव्यवस्थेला विरोध करून ‘अजात’ पंथ गणपती महाराजांनी उभा केला. ‘अजात’ पंथाच्या विदर्भातील अनेक गावात पालखी निघायच्या. अजात पंथीय लोक गरीब आहे. त्यामुळे गणपती महाराजांच्या कार्याचे ऐतिहासिक दाखले मिळत नाही. अशा गणपती महाराजांचे कार्य म्हणजे महाराष्ट्रातील जातीअंताच्या लढाईचे एक ‘अज्ञात’ पर्व होय.
त्यांच्या मृत्यूनंतर या अजात समूहातील लोकांची काय दुर्दशा होते, शासन दरबारी त्यांना काय खस्ता खाव्या लागल्या? त्यांच्या अनुयायांनी त्या पंथाची केलेली अवस्था, त्यांनी जात वास्तविकपणे लावून घेणे किंवा त्यांना पर्याय नसल्याने ती लावून घेणे; या सर्व गोष्टी प्रथमदर्शनी हा सिनेमा पाहताना जाणवतात. परंतु मी थोडं वेगळं या सिनेमाकडे पाहतो. गणपती महाराजांना जात नसावी हे का वाटलं, त्यांचे कार्य का दडवण्यात आले? की हेतू पुरस्सर ते लपवून ठेवण्यात आले, असे प्रश्न समोर येतात.
पंढरपुरात त्यांचा पंथ मानणा:या लोकांसाठी स्वतंत्र असे त्यांनीच बांधलेले आश्रम काही नाकारतात आणि विठ्ठल भक्ती स्वीकारली जाते. प्रत्येक अभंगातून विचारांचा जागर बाहेर पडतो. अशा गणपती महाराजांचा शेवट काय झाला, हे सूत्र दिग्दर्शक अरविंद जोशी यांनी पकडलं आहे. सगळ्या माहितीपटात खूप सा:या मुलाखती आहेत. पण प्रत्येक मुलाखतीचा संदर्भ जोडून पाहिला तर आपल्या लक्षात येते की, त्या मुलाखती खूप सांगून जातात. अमरावती जिल्ह्यातील गणपती महाराजांचा वैश्विक विचार समजून घेण्यासाठी मदत होते. महाराजांनी वारकरी संप्रदाय स्वीकारला, पण पूर्णत: स्वीकारला, असे मुळीच वाटत नाही. माहितीपटाच्या यांत्रिक-तांत्रिक बाजूपेक्षा या माहितीपटातून पुढे काय येतं, हे लक्षात घ्या. माणूस लग्न करतो. पण सुरुवातीला जातीत लग्न करायचं, हे सगळं बंद करून अांतरजातीय विवाह त्यांनी सुरू करून सामाजिक काम उभं केलं. परंतु काळाचा इतिहास त्यांना गिळून गेला. हे नेमकं सूत्र या माहितीपटाकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल.
मूळात त्यानंतर या अजात समूहाची दैना काय झाली, कागदी घोडय़ासमोर त्या पंथातील मुलांची शैक्षणिक वाताहत होत असताना पर्याय म्हणून आपली जात स्वीकारणं हे गरजेचं वाटू लागले आणि या समूहातील लोकांना आपली जात स्वीकारावी लागली. हे एकप्रकारे मानसिक शोषण इथल्या व्यवस्थेने केलं आणि तो पूर्ण समूह त्यात व्यवस्थित गिळंकृत केला गेला. ज्या कार्याला गणपती महाराजांनी स्वत:ला वाहून घेतले ते सर्व पद्धतशीरपणे मागे टाकण्यात आले.
गणपती महाराजांची यात्रा कशासाठी होती, याचा विचार त्या काळच्या सामाजिक जीवनाकडे पाहिला की, आपल्या लक्षात येतं की, गणपती महाराज हे ती यात्रा सामूहिक विवाह, तेही आंतरजातीय यासाठी आयोजित करत होते. मूळात या मागील दूरदृष्टी ही गणपती महाराज यांच्याकडेच होती. नंतरच्या काळात हा विचार बाजूला कसा पडतो याचा वेध घेता येतो. माहितीपट बदलत्या सामाजिक परिस्थितीचा आढावा सादर करतो. शिवाय ऐतिहासिक संदर्भ कसा मागे पडतो यांचे अनेक कंगोरे आपल्याला दाखवतो. मग त्या समूहातील नंतरच्या काळात दृष्टिकोन ठेऊन असणारे अनुयायी तयार झाले नाही हे सिद्ध करतो. परंतु आनंद पटवर्धन आणि तसेच भालचंद्र नेमाडे या माहितीपटाविषयी खूप आशय संपन्नतेने पाहतात आणि कौतुक करतात. शिवाय या माहितीपटाला अनेक पुरस्कार आणि सन्मान सध्या मिळत आहे. माहितीपटातील एक अभ्यासपूर्ण दस्तावेज म्हणून या माहितीपटाचा प्रवास खूप दूर्पयत सुरू राहील, यात शंका नाही.
मात्र इथला ग्रामीण प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून हा माहितीपट नाही, बुद्धीजीवी वर्ग या माहितीपटाकडे कसे पाहील हे काळ ठरवेलच. काळाच्या पडद्यावर किती ठसे या माहितीपटाचे राहतील हे अजून तरी ठरवता येणार नाही. तरुण दिग्दर्शकाचा हा मोलाचा आणि महत्त्वाचा प्रवास सुरू झाला आहे. सूत्रधार म्हणून कवी सत्यपालसिंह राजपूत यांनी या माहितीपटाविषयी घेतलेली मेहनत त्यांना आर्थिक साह्य करणा:या सर्व ज्ञात-अज्ञात लोकांची मदत ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी मोलाची ठरते आहे. मी म्हणेल ब्लँक हिस्ट्री हे पर्व पुन्हा सुरू होऊन इथली जातीयवादी व्यवस्था मोडकळीस आणण्यासाठीचं मोठं पाऊल हा माहितीपट गाठेल आणि मैलाचा दगड उभा केल्याशिवाय राहणार नाही
परिवर्तन जळगाव या संस्थेने नेहमी जळगावातील रसिकांना नावीण्यपूर्ण गोष्टी दिल्या आहेत. हा माहितीपट असाच एक कायम लक्षात राहील; ज्याने जातीयतेची झापडं उघडी केली त्यासाठी परिवर्तन जळगाव आणि टीमचे धन्यवाद मानले तरी ते पूर्ण होणार नाही.
- उदय येशे