जळगाव : विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविण्यासाठी चॉईस बेस्ड् क्रेडिट सिस्टीम प्रणाली महत्वाची ठरणार आहे. यातून आंतरविद्याशाखा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे सर्व घटकांनी सकारात्मक स्वीकार करावा असे आवाहन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी शनिवारी फैजपूर येथे केले.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि धनाजी महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २८ रोजी फैजपूर येथे चॉईस बेस्ड् क्रेडिट सिस्टीम अभ्यासक्रम कार्यशाळा झाली. व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.नितीन बारी, अधिष्ठाता प्राचार्य डी.आर.पाटील, प्राचार्य पी.पी.छाजेड, डॉ.लता मोरे तसेच डॉ.अनिल पाटील, प्राचार्य व्ही.आर.पाटील, अधिसभा सदस्य डॉ.के.जी.कोल्हे, प्रा.ए.पी.सरोदे, डॉ.डी.ए.कुमावत उपस्थित होते.प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचे शासनाने जाहीर केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ.डी.आर.पाटील यांनी या प्रणालीचे स्वरुप व महत्व सांगितले. सूत्रसंचालन डॉ.सागर धनगर यांनी तर आभार उपप्राचार्य ए.जी.सरोदे यांनी मानले.
चॉईस बेस्ड् क्रेडिट सिस्टीमचा सर्व घटकांनी सकारात्मक स्वीकार करा : कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 7:30 PM
विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविण्यासाठी चॉईस बेस्ड् क्रेडिट सिस्टीम प्रणाली महत्वाची ठरणार आहे. यातून आंतरविद्याशाखा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे सर्व घटकांनी सकारात्मक स्वीकार करावा असे आवाहन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी शनिवारी फैजपूर येथे केले.
ठळक मुद्देफैजपूर येथे झाली कार्यशाळाउमविला बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्याने शासनाचे मानले आभारआंतरविद्याशाखा अभ्यास करता येणार