जळगाव : आरोग्य सेवा ही आपत्कालीन सेवेत येते, त्यामुळे यात कुठलीही कचुराई असता कामा नये, यात थेट जीवन-मरणाचा प्रश्न येत असल्याने केंद्र सरकारने यात आजारांमध्ये कुठलाही भेदभाव न करता सरळ सर्व आजारांचा सर्व योजनांमध्ये समावेश करावा व स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा अधिकाधिक पारदर्शकतेने व तत्परतेने पुरविण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष नियोजन करावे, अशा अपेक्षा या क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी व्यक्त केल्या आहे़तकेंद्र सरकारतर्फे सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पात आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे़ अनेक शासकीय रूग्णालयांमध्ये व्हेंटीलेटरची सुविधा नाही, या बाबींवर लक्ष केंद्रीत करून रूग्णालयांचा विस्तार वाढणे अत्यंत गरजेचे असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे़औषधी शासकीयच मिळावीअनेक आजारांची औषधी शासकीय रूग्णालयांमध्ये उपलब्ध नसते, त्यामुळे रूग्णांना आर्थिक भुर्दंड बसतो, अशा स्थितीत ही सर्व आजारांवरील औषधी शासकीय रूग्णालयातच उपलब्ध होण्यासंदर्भात तरतूद होणे आवश्यक असल्याची अपेक्षा आहे़अनेक महागडे उपचार योजनांबाहेरचकेंद्र व राज्य शासनाने अनेक योजना आणल्या आहे़ त्यांची अंमलबजावणी व्यवस्थीत होणे हे अत्यंत गरजेचे आहे़ शिवाय अनेक आजारांचे महागडे उपचार असतात ज्यांचा आजही या योजनांमध्ये समावेश झालेला नसल्याने अनेक गरीब रूग्णांना आजही केवळ या आजारांवर इलाज शक्य नसल्याने ते उपचार घेत नसल्याचे वास्तव आहे़ त्यामुळे या उपचारांचाही योजनांमध्ये समावेश होणे आवश्यक असल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले़योजनांची अंमलबजावणीतून गरिबांना दिलासा मिळावाकेंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत मात्र, गरिबांना आजही उपचारांसाठी चकरा माराव्या लागतात, वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी असतात, आरोग्य सुविधांच्या बाबतीत नियमित असंख्य तक्रारी असतात़ केंद्र सरकारने ही आपात्कालीन सुविधा म्हणून याकडे त्या दृष्टीने बघून यावर अधिकाधिक तरतूद करून त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, यावर नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे़कर्करोगग्रस्त कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी योजना असाव्यात, कर्करोगग्रस्तांना रेल्वेत कायमस्वरूपी सुविधा मिळाव्यात, अनेक अजारांचा योजनांमध्ये समावेश करावा़ -राज मोहम्मद खान शिकलगर, सदस्य, जिल्हा तंंबाखू मुक्त नियंत्रण समन्वय समितीशासकीय रूग्णालयात होणाºया विविध तपासण्यांचे दर कमी व्हावेत, गरीबांना योग्य सुविधा मिळण्यासाठी स्वतंत्र तरतुदींची आवश्यकता आहे़ केसपेपरही वीस रूपयात निघतो, हे कमी झाले पाहिजे.-मुकुंद गोसावी, अध्यक्ष, मुक्ती फाऊंडेशननवजात शिशू काळजी विभागात व्हँटीलेटरची सुविधा असणे अत्यावश्यक आहे़ शासकीय रूग्णालयात ही सुविधा पुरविण्यासाठी विशेष तरतूद हवी, महिलांशी संबधित अनेक आजारांचा योजनांमध्ये समावेश करावा.-फिरोज पिंजारी, अध्यक्ष, जननायक फाऊंडेशन
सर्व आजारांचा सरकारी योजनांमध्ये समावेश हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 1:16 PM