जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या बंद ठेवण्याचाही निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले. कामानिमित्ताने उद्योगांच्या ठिकाणी कामगार एकत्र येतात, त्यामुळे यातून संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे याला आळा बसावा म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आल्यानंतर आता अतिमहत्वाच्या आस्थापना वगळता अन्य आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीमधील कंपन्याही यामुळे बंद राहणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, कंपनी व तत्सम आस्थापना २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या बंदचे औषध निर्मिती तसेच वैद्यकीय सेवा साहित्य निर्मिती करणाºया कंपन्या, सॅनिटायझर, साबण, जंतूनाशक, हॅण्डवॉश निर्माण करणाºया कंपन्या, कृषी उत्पन्नावर प्रक्रिया करणाºया कंपन्या, अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवणाºया कंपन्या, कारखाने, उद्योग, व्यवसाय यांना हे आदेश लागू राहणार नाहीत, असे शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.दरम्यान, हा निर्णय होण्यापूर्वी लघु उद्योग भारतीने पुढाकार घेऊन स्वयंस्फूर्तीने उद्योग बंद ठेवण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती अध्यक्ष किशोर ढाके यांनी दिली. या निर्णयास जिंदासह इतर संघटानांकडून पाठिंबा मिळू लागला. त्यामुळे उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत होते. मात्र त्या दरम्यान बंदचे आदेश निघाले.
आर्थिक वर्षाच्या कामकाजासाठी गर्दी नकोप्राप्तीकर परतावा, जीएसटी परतावा व इतर आर्थिक व्यवहारांसाठीची मुदत या महिन्यात संपते. त्यामुळे या कामांसाठी अनेक जण लगबग करीत असतात. मात्र हे काम करीत असताना सीए मंडळी अथवा इतर ठिकाणी पाचपेक्षा जास्त जण येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.