जळगाव : एकच पर्व बहुजन सर्व, उठ बहुजना जागा हो, संघर्षाचा धागा हो.. या सह विविध घोषणा देत निघालेल्या बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी शहर दणाणून गेले. विशेष म्हणजे मोर्चाचे नेतृत्व युवतींनी केले. मोर्चात सर्वात पुढे 11 युवती होत्या. त्यांनीच बहुजनांच्या विविध मागण्या जिल्हाधिका:यांसमोर मांडून आपल्या भावना शासनार्पयत पोहोचवाव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्याकडे केली. ओबीसी, अनुसूचित जाती व आदिवासी भटके विमुक्त, मुस्लीम या समुहांना संघटीत करून बहुजन समाजाच्या घटनात्मक हक्क व अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी बुधवारी शिवतीर्थ मैदानापासून बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्रचंड गर्दी, महिलांचाही सहभागमोर्चा निमित्ताने सकाळी 10 वाजेपासून जिल्हाभरातून येत असलेल्या बहुजन समाज बांधवांची शिवतीर्थ मैदानावर गर्दी होत होती. यात युवक, महिलांचा मोठा सहभाग होता. दुपारी 12 वाजेर्पयत संपूर्ण शिवतीर्थ मैदान गर्दीने खच्चून भरले होते. मैदानाच्या दोन्ही दरवाजाने घोषणा देत बहुजन कार्यकत्र्याचा ओघ दुपारी 12.45 वाजेर्पयत सुरू होता. विविध घोषणात देत हे कार्यकर्ते मैदानावर येत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दीजिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 2.30 वाजता मोर्चा धडकला. यावेळी कार्यालयासमोरील रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक बंद करण्यात आली होती. मोर्चात अग्रभागी असलेल्या 11 युवतींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या दालनात जाऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. यात ममता दिलीप सपकाळे व सिमा ठाकुर या युवतींना मोर्चाचा उद्देश सांगितला. बहुजनांच्या विविध प्रश्नांची मांडणी त्यांनी केली. तसेच अॅक्ट्रासिटी कायदा अधिक कडक केला जावा, त्यात बदल कदापी होऊ नये, कायदा कडक असता तर दलित, दिन-दुबळ्यांवर अत्याचार झाले नसते अशी भूमिका यावेळी युवतींनी मांडल्या. बुलढाणा येथील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना कडक शासन करावे, व्हॅलिडीटीत येणा:या अडचणी याबाबत या युवतींनी जिल्हाधिका:यांशी चर्चा केली. दोन ठिकाणी वाहनतळशहरात जिल्हाभरातून नागरिक येणार असल्यामुळे खान्देश सेंट्रल व मणियार लॉ कॉलेज येथे पार्किगची व्यवस्था करण्यात आली होती तेथेही कार्यकर्ते मार्गदर्शनासाठी तैनात करण्यात आले होते. शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक, मोर्चा जात असलेला मार्ग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तसेच जिल्हाधिका:यांच्या दालनाबाहेर, कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवतीर्थ मैदान तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सभेच्या ठिकाणी दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते. पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्यासह शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रमुख मोर्चावर लक्ष ठेऊन होते. वाहतुकीस बंद करण्यात आलेल्या मार्गावर तसेच शहरात अन्यत्र बंदोबस्त होता.
एकच पर्व बहुजन सर्व
By admin | Published: January 12, 2017 12:27 AM