जळगाव : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींसोबत प्रौढाला मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉ.गोरख हिंमतराव पाटील या तिघांची पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयाने रविवारी कारागृहात रवानगी केली.खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या चिंग्या उर्फ चेतन आळंदे याची १३ रोजी न्यायालयात तारीख होती. तेथील कामकाज संपल्यानंतर चिंग्याने गार्ड ड्युटीला असलेल्या पोलिसांसोबत खासगी कारने तुकारामवाडीत जावून अरुण भिमराव गोसावी यांना मारहाण करुन कारमध्ये डांबून ठेवले होते. या प्रकरणी चेतन आळंदे, गोलु उर्फ लखन दिलीप मराठे, हवालदार मुकेश पाटील, सुरेश सपकाळे व कॉ. गोरख पाटील यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.चिंग्याच्या प्रकरणात मुकेश पाटीलचीच नियुक्तीचिंग्या याला न्यायालयात तारखेवर नेण्यासाठी मुकेश पाटील या कर्मचाऱ्याचीच नियुक्ती केली जात असल्याची ओरड आहे. जानेवारी महिन्यातही मुकेश पाटील याने चिंग्याला सकाळी १०.४५ वाजता कारागृहातून बाहेर काढून रात्री ९ वाजता कारागृहात नेले होते. तेव्हा देखील वाद उद्भवला होता. आताही मुकेश पाटील याच कर्मचाºयाची नियुक्ती झाली. आता देखील तो १२ तास बाहेर होता. त्याला रात्री ११ वाजता कारागृहात हजर केले. चिंग्याच्या प्रकरणात मुकेश पाटील यांचीच नेमणूक का केली जाते?, नेमका प्रकार आहे तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कारागृहात असलेल्या चिंग्या आणि त्याचा साथीदार लखन या दोघांना अटक करण्यासाठी तपासाधिकारी विशाल सोनवणे यांनी न्यायालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. सोमवारी दोघांचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.एका पोलिसाला चाळीसगावातून अटकया गुन्ह्यातील संशयित पोलीस मुकेश पाटील याला चाळीसगाव येथून ताब्यात घेण्यात आले. गोरख पाटील हा सिल्लोड येथून थेट पोलीस स्टेशनला आला तर सपकाळे याला पोलीस लाईनीतील घरातून ताब्यात घेण्यात आले. तपासाधिकारी विशाल सोनवणे यांनी तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले. दरम्यान, या तिघांवर आज निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
कोठडीचा हक्क राखून तीनही पोलीस कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:16 PM