शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

आघाडी-युती आधीच जागावाटपावर तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:26 PM

राष्टÑवादी ९ तर काँॅग्रेसही ६ जागांवर ठाम ; जळगाव शहर व मुक्ताईनगरच्या जागेसाठी शिवसेना आग्रही

जळगाव : विधानसभेच्या निवडणुकीत कॉग्रेस-राष्टÑवादीची आघाडी होईल की शिवसेना-भाजपाची युती कायम राहील याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र, त्याआधीच जिल्ह्यातील ११ विधानसभेच्या जागांबाबत चारही पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत.शुक्रवारी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेश आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्टÑवादी जिल्ह्यात ९ जागा लढवेल, कॉँग्रेससाठी जळगाव शहर व रावेर या दोन जागा सोडल्या जातील, अशी घोषणा केली. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुक्ताईनगरच्या जागेवर दावा केला होता. तसेच जळगाव शहराची जागा युतीच्या काळात शिवसेनेकडेच राहिल्याने ही जागा या निवडणुकीतही शिवसेनेकडेच यावी यासाठीही शिवसेना नेते आग्रही आहेत. दरम्यान, जळगाव शहरात व मुक्ताईनगर येथे विद्यमान आमदार भाजपाचे आहेत. अशा परिस्थितीत भाजपा या जागा मित्रपक्षासाठी सोडेल का ? हा प्रश्न असला तरी चारही प्रमुख पक्षांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येत आहे.चित्रा वाघ यांना आघाडीत बिघाडी करावयाची आहे - पाटीलजिल्ह्यात राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रसने किती जागा लढवायचा याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरचे नेते घेत असतात. मात्र, चित्रा वाघ यांनी राष्टÑवादी जिल्ह्यात ९ जागा लढविणार व कॉँग्रेसला केवळ २ जागा देणार हे वक्तव्य केवळ आघाडीत बिघाडी करण्याचा हेतुने केले असून, त्यांना याबाबत कोणताही अधिकार नसल्याची माहिती कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. २००४ व २००९ मध्ये राष्टÑवादीसोबत युती असताना कॉँग्रेस जळगाव शहर, जामनेर, रावेर व अमळनेर या चार जागांवर निवडणूक लढविली असल्याने आगामी विधानसभेत कॉँग्रेस परंपरागत चार जागांसह आणखीन दोन जागा वाढवून एकूण ६ जागांवर निवडणूक लढविणार असून याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.पाटील यांनी दिली.अमळनेरच्या जागेच्या बदल्यात चोपड्याची मागणीआघाडीच्या काळात जिल्ह्यातील अकरा जागांपैकी ७ जागा राष्टÑवादी तर ४ जागा कॉँग्रेस लढले. आता अमळनेरमध्ये भाजपामधून राष्टÑवादीत आलेले अनिल पाटील हे इच्छुक असल्याने त्यांच्यासाठी या जागेवर राष्टÑवादीकडून दावा केला जात आहे. मात्र, या बदल्यात कॉँग्रेसकडूनही चोपड्याची जागा मागितली जात आहे. त्याच्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला २००४-२००९ प्रमाणे राहिल्यास काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.भाजपा-सेनेचाही ६-५ चा फार्म्युला ?भाजपा व शिवसेनेचा जिल्ह्यात ६ व ५ जागांचा फॉर्म्युला आहे. तोच फॉर्म्युला या निवडणुकीत युती झाल्यास कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्यावेळेस शिवसेना व भाजपा विरोधात लढल्याने शिवसेनेची हक्काची जळगाव शहर व भुसावळ या ठिकाणी पराभव झाला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती झाल्यास जळगाव शहराची जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असून, भुसावळची जागा शिवसेनेला गमवावी लागण्याची शक्यता आहे. तर एरंडोल, पाचोरा, चोपडा व जळगाव ग्रामीणसह जळगाव शहर या पाच जागा सेनेकडे जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव