जळगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातील विविध सेवाभावी संस्थांतर्फे गोरगरिबांना फराळाचे वाटप करण्यात आले.फैजपूर येथील बेघर वस्तीत दिवाळीचा फराळ, दिवे तसेच कपडे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात राजेश महाजन, रमेश सराफ, किरण चौधरी, नितीन बोरोले, राजेंद्र भारंबे, साजन चौधरी, विनोद कोल्हे, दीपक भारंबे, अविनाश चौधरी, ललित चौधरी, किरण वाघूलदे, अनंत नेहेते, संदीप होले, अजय बालाणी उपस्थित होते.भुसावळ शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे ‘वाटीभर फराळ द्या, वंचितांचे तोंड गोड करा’, हा उपक्रम दिवाळीनिमित्त राबवण्यात आला. त्यात मंगळवारी सातपुड्यातील काळाडोह, मोर धरण व विटवा अशा तीन वाड्या-वस्तीतील ४०० जणांना फराळ, नवीन कपडे, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रकल्पप्रमुख जीवन महाजन, समन्वयक भूषण झोपे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील दात्यांकडून मदत गोळा केली. त्यातून हा उपक्रम राबवण्यात आला. वाड्यावस्त्यांतील बंधू-भगिनी व चिमुकल्या बालकांच्या चेहऱ्यावर फराळ व नवीन कपडे स्वीकारताना हास्य फुलले होते.हरताळे, ता.मुक्ताईनगर- प.पू. गुरुवर्य रामभाऊ पुजारी बाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रमातर्फे आदिवासी भागातील हलखेडा, लालगोटा, थेरोळा या आदिवासी पाड्यांवरील सुमारे १०० कुटुंबीयांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधीक्षक किशोर गावंडे, डॉ. खिरळकर, किरण महाजन, रामभाऊ टोंगे, रघुनाथ पाटील, रंगराव पाटील, दिनकर मोरे, शरद मोहोळ, मधुकर भोई, वसंता पाटील, सिक्रेट बाबू पवार, शफी भोसले, मोशीन पठाण व ग्रामस्थ उपस्थित होते.भुसावळ : रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटीतर्फे आदिवासी तांड्यावर दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले. सर्व सदस्यांनी आपापल्या घरातील फराळ एकत्र करून भीलमळी व मुशालतांडा येथील रहिवाशांना तब्बल १२७ किलो फराळ वाटप केले. हा उपक्रम गत पाच वर्षांपासून सुरू असून, तांड्यावरील सर्व महिला व बालगोपाल यांना अती आनंद झाला. यशस्वितेसाठी अध्यक्ष सोनू मांडे, सेक्रेटरी डॉ.मकरंद चांदवडकर, प्रोजेक्ट चेअरमन सागर वाघोदे तथा रोटरी क्लब सदस्य चेतन पाटील, विनायक फालक, मनोज सोनार, पंकज भंगाळे, महेश चौधरी, उमेश घुले, संदीप जोशी, पंकज भंगाळे आदींनी परिश्रम घेतले.
भुसावळ विभागात दिवाळीनिमित्त सेवाभावी संस्थांतर्फे फराळ वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 5:11 PM
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातील विविध सेवाभावी संस्थांतर्फे गोरगरिबांना फराळाचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देगणपती ग्रुपचा अभिनव कार्यक्रमअंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे सातपुड्यात ४०० जणांना फराळासह कपडे वाटपरामरोटी आश्रमातर्फे दिवाळी फराळ वाटपरोटरी रेलसिटीतर्फे आदिवासींना दिवाळी फराळ वाटप