पाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : जामनेर तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत मिळणाऱ्या तांदूळ व डाळी मालाचे जिल्हा परिषद व खासगी १३० शाळेत वितरण करण्यात आले.सध्या कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे शासनाने १६ मार्चपासून शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे शाळांमध्येच शिल्लक असलेले पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना व पालंकाना वितरित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्याने या परिस्थितीत आदेशाची अंमलबजावणी करताना मुख्याध्यापक व शिक्षकांची दमछाक होत आहे.३ एप्रिलपर्र्यंत १३० शाळेतील ११ हजार ७३० विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात आले. यात विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संपर्क टाळून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गर्दी होणार नाही याची काळजी घेत ४९, ३५७ कि.ग्रॅ. तांदूळ व ९,५५७ कि.ग्रॅ. डाळीचे विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्यात आले.यावेळी बºयाच ठिकाणी गटविकास अधिकारी लोखंडे व गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. संपूर्ण भारतभर लॉकडाऊन असल्याने तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी शिक्षकांना सहकार्य केल्याचे शालेय पोषण आहार अधीक्षक विष्णू काळे यांनी सांगितले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळी वाटप करण्यासंदर्भात शासनाचे आदेश आहे. त्यानुसार लॉकडाउनचे पालन करून तालुक्यातील १३० शाळेत आजअखेर वाटप करण्यात आली आहे. उर्वरित शाळांमध्ये माल पोहचत असून, लवकरच तीन-चार दिवसात वाटप पूर्ण होईल.-विष्णू काळे, अधीक्षक, शालेय पोषण आहार, जामनेर
जामनेर तालुक्यातील १३० शाळेत शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 3:29 PM