भडगाव, जि.जळगाव : गेल्या महिन्यात वादळ-वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या ७८ घरांसाठी चार लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले.तालुक्यात जून महिन्यात वादळवाºयासह झालेल्या पावसाने तालुक्यातील बोदर्डे, कनाशी, देव्हारी, कोठली, निंभोरा, पांढरद परिसरात गावांना वादळाचा फटका बसून घरांच्या पडझडीने नुकसान झाले होते. त्यावेळी महसूल प्रशासनाने एकूण ३६३ घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे महसूल प्रशासनाने प्रस्ताव पाठविले होते. यापैकी शासनाने एकूण ७८ नुकसानग्रस्त लाभार्र्थींसाठी एकूण चार लाखांचे मंजूर अनुदान नुकतेच महसूल प्रशासनामार्फत वाटप करण्यात आले.प्रत्येक लाभार्थीला सुमारे सहा हजार रुपयांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळाला आहे. तसेच उर्वरित लाभार्र्थींना शासनाचे अनुदान प्राप्त झाल्यावर वाटप करणार असल्याची माहितीही महसूल प्रशासनाने दिली. अनुदानाची रक्कम थेट लाभार्र्थींच्या बँक खात्यावर पाठविली आहे. त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.
भडगाव तालुक्यात ७८ घरांसाठी ४ लाख पडझडीचे अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 4:07 PM
गेल्या महिन्यात वादळ-वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या ७८ घरांसाठी चार लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देअनुदानाची रक्कम थेट लाभार्र्थींच्या बँक खात्यावरप्रत्येक लाभार्थीला सुमारे सहा हजार रुपयांपर्यंत अनुदानाचा लाभ