भडगाव : पूर्वीचा भडगाव-पारोळा व आता पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात कधी राष्टÑवादी तर कधी शिवसेना असे वर्चस्व दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भडगाव तालुका भाजपाचा बालेकिल्ला ठरत आहे. सध्या मात्र तालुक्यात सर्वत्र शिवसेनेची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादी व काँग्रेस सोबत असल्याचे चित्र असताना शिवसेना-भाजपा युतीत मात्र मतभेदाची दरी दिसत आहे.भडगाव तालुका पाचोरा विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. येथेही मागील निवडणुकीत राष्टÑवादी तर आता सध्या शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत राष्टÑवादीचे दिलीप वाघ आमदार म्हणून निवडून आले. या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर पाटील आमदार म्हणून निवडून आले. राष्टÑवादी व शिवसेना अशी सत्ता कायम सुरू आहे. मागील काळात भडगाव पंचायत समिती, पालिका, शेतकरी सहकारी संघ, स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्टÑवादीचे वर्चस्व होते. परंतु राष्टÑवादीने हातची सत्ता गमावल्याचे चित्र आहे.विधानसभेत आमदार शिवसेनेचेभडगाव पंचायत समितीत राष्टÑवादीला सोबत घेत शिवसेनेने सत्ता काबीज केली आहे, तर भाजपाने दोन जागा निवडून ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी सहकारी संघावर शिवसेनेची सत्ता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवरही शिवसेनेचे वर्चस्व आहे. पालिकेत शिवसेनेचे अतुल पाटील हे नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. राष्टÑवादीचे बहुमत असून एकाही उमेदवाराने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत साधा नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्जही दाखल केला नव्हता. असे चित्र प्रथमच पहावयास मिळाले. शिवसेनेने अपक्ष व भाजपाच्या मदतीने पालिकेत सत्ता स्थापन केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक मतदान झाले होते. तालुक्यात राष्टÑवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये एरव्ही अंतर्गत विरोधाची भूमिका दिसत असते. आता मात्र हम साथ साथ है असे चित्र आहे. भाजपा-शिवसेना तालुक्यात युतीत असतानाही युतीत दरी दिसत आहे.
आघाडी साथ साथ, युतीत मात्र मतभेदाची दरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:25 AM