जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण घटण्याची काही चिन्हे नाहीत. शनिवारी ९७१ रुग्णांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले असून दुसऱ्या लाटेत सर्वाधिक म्हणजे आठ रुग्णांचा मृत्यू शनिवारी झाला. जळगाव शहराला शनिवारी चोपडा शहराने मागे टाश्ले असून शनिवारी चोपड्यात २६६ एवढे रुग्ण आढळले.जळगाव शहरात १९५ रुग्ण आढळले. या सर्व रुग्णांचे अहवाल हे आरटीपीसीआरव्दारे केलेल्या चाचण्यांचे आहेत. एरंडोलमध्ये ९६ रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ९७१ रुग्णांपैकी ४७९ रुग्ण हे आरटीपीसीआरचे तर ४९२ रुग्ण हे अँटिजनचे आहेत. शनिवारी एकूण ७५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या ९ हजार ४३४ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. शनिवारी पहिल्यांदाच जळगाव शहराला मागे टाकत चोपडा तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चोपडा तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ही आता ७ हजार ८० वर गेली आहे.