कुंदन पाटील
जळगाव : ऐन उन्हाळ्यात अनेकांना घरात कोंबलेला रेनकोट बाहेर काढावा लागला आहे. पहाटे थंडी, दुपारी ऊन तर सायंकाळी पासऊ हजेरी लावत असल्याने महिला वर्गाच्या वाहनाच्या डिकीत आता ‘रेन’कोटनेही जागा घेतली आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यात जळगावकर उन्हाच्या दाहकतेने भाजून निघतात. यंदा मात्र निसर्गाने रंग बदलविला आहे. वादळ, वारा, गारपिटीसह पावसाने सातत्याने हजेरी लावली.त्यामुळे यंदा तापमानाचा पारा ४२ अंशावर गेलेच नाही. तशातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी कायम ठेवली आहे. शुक्रवारी जोरदार पावसामुळे अनेकांची फजिती झाली. त्यामुळे शनिवारी अनेकांनी घरात ठेवलेला ‘रेनकोट’ पुन्हा बाहेर काढला. त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
विक्रेतेही हतबल
उन्हापासून बचावासाठी बाजारात आणलेल्या रुमाल, टोपी, नेटसह अन्य साहित्याला यंदा मागणीच नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या भरवशावर भांडवल अडकवून बसलेल्या अनेक व्यापाऱ्यांसह विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे.
सर्वाधिक पाऊस पारोळ्यात
शुक्रवारी पारोळ्यात सर्वाधिक पाऊस झाला. चाळीसगाव, धरणगाव तालुकावगळता अन्य सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. पारोळा, जळगाव व अमळनेर तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.शुक्रवारी झालेला सरासरी पाऊस मि.मी.मध्येतालुका- पाऊसजळगाव-२.४भुसावळ-०.५यावल-१.५रावेर-०.१मुक्ताईनगर-०.१अमळनेर-२.२चोपडा-१.८पारोळा-३.९चाळीसगाव-००जामनेर-०.४पाचोरा-०.८भडगाव-०.८धरणगाव-००बादेवड-१.२