जळगाव : मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय घोलप यांची मनपाने आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांच्या जागेवर प्रभारी आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. घोलप यांच्यावर काही वर्षांपूर्वी एका महिला कर्मचा-याने लैंगिक छळाचा आरोप केला होता. यामध्ये डॉ.घोलप यांनी चूक मान्य केली होती. त्यावर मनपाने डॉ. घोलप यांची दोन वर्षाची वेतनवाढ बंद केली होती.मात्र, आता त्याच मनपा प्रशासनाने लैंगीक छळाचा आरोप असलेल्या अधिकाºयाला मनपाने प्रभारी आरोग्याधिकारी पद व दिलेल्या सन्मानामुळे कर्मचाऱ्यांसह नगरसेवकांकडून देखील संताप व्यक्त केला जात आहे.२०१६ मध्ये तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय घोलप यांच्यावर एका महिलेने केलेल्या लैंगीक छळाचा आरोप केला होता. यामध्ये मनपाने चौकशी करून, याबाबत सुनावणी घेतली होती. या सुनावणीदरम्यान डॉ. घोलप यांनी चूक मान्य केली होती. त्यावर मनपाने तेव्हा डॉ.घोलप यांची दोन वर्षाची वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता तीन वर्षानंतर याच घोलप यांना प्रभारी आरोग्याधिकारी पदाची बक्षीसी देण्याचा धाडसी निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला, त्यामुळे या निर्णयावर सर्वत्र सर्वत्र टीका होत आहे.स्थायी समितीत गाजल होता विषयडॉ.घोलप यांनी स्वत: चूक मान्य केल्यानंतर मनपाने कारवाई केली होती. मात्र, त्याच मनपा प्रशासनाने १३ डिसेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत डॉ.घोलप यांच्या वेतनवाढ थांबविण्याचा निर्णयात अंशत बदल करण्याचा प्रस्ताव स्थायी पुढे मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावाविरोधात शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी तीव्र आक्षेप घेत हा प्रस्ताव नामंजूर करण्याची मागणी केली होती. तसेच केवळ वेतनवाढ रद्दचा निर्णय न घेता संबधित कर्मचाºयाला कामावरून काढण्याचीही मागणी लढ्ढा यांनी केली होती. शिवसेना नगरसेवकांच्या विरोधानंतर भाजपा नगरसेवकांनी देखील हा प्रस्ताव तहकूब ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पुढील स्थायी समितीच्या सभेत यावर अभ्यास करून निर्णय घेण्याचे ठरले होते.भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपात खरच तथ्य आहे का ?स्थायी समितीच्या सभेत नितीन लढ्ढा यांनी डॉ.घोलप यांच्याबाबत मनपा प्रशासनाकडून दाखविण्यात येणाºया सहानुभूतीबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. तसेच हे प्रकरण मिटविण्यासाठी भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप त्यांनी केला होता. मनपाच्या प्रस्तावावर स्थायीची सभा गाजल्यानंतर मनपाने लगेच डॉ.घोलप यांना प्रभारी आरोग्य अधिकाºयाचे पद देण्यामागे नेमके काय साध्य केले आहे ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच नितीन लढ्ढा यांच्या आरोपात खरच तथ्य असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे ? लैंगिक छळाबाबतचे गंभीर आरोप असताना त्या अधिकाºयावर कारवाई न करता त्यांना मोठे पद देऊन त्यांचा सन्मान करण्याच्या भूमिकेमुळे मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.प्रभारी उपायुक्तांनी केली नियुक्ती१३ रोजी स्थायी समितीची सभा झाली. याच सभेत डॉ.घोलप यांच्या वेतनवाढीबाबतच्या प्रस्तावावर खडाजंगी झाली. त्यानंतर सभा संपल्यानंतर प्रभारी उपायुक्त कपिल पवार यांनी आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांच्या जागेवर प्रभारी आरोग्य अधिकारी म्हणून डॉ.घोलप यांची निवड केली. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अजित मुठे हे पुणे येथे दौºयावर असल्यामुळे कपिल पवार यांच्याकडे प्रभारी उपायुक्तपदाचा अतिरीक्त चार्ज होता. विशेष म्हणजे ते स्वत: स्थायी समितीच्या सभेत देखील उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी नियुक्ती करण्याची घाई का केली ? याबाबत देखील प्रश्नचिन्ह उभे राहते.मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार या प्रकारामुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून संबधित अधिकाºयाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. डॉ.घोलप यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांच्याकडे प्रभारी आरोग्य अधिकारीपद देणे चुकीचे आहे. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची शंका आहे.-नितीन लढ्ढा, माजी महापौरकोणत्या अधिकाºयाला कोणते पद देणे हा निर्णय प्रशासनानेच घ्यावा. मात्र, डॉ.घोलप यांच्याबाबत स्थायीत चर्चा झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांना प्रभारी म्हणून पद देणे चुकीचे आहे. याबाबतीत लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र, मनपाचा मनमानी कारभार यावरून दिसून येत आहे.-अॅड.शुचिता हाडा, सभापती, स्थायी समिती
लैंगिक छळाचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याचा असाही सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:12 PM